कवी केतन पिंपळापुरे स्मृती आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्काराने संजय पवार सन्मानित

0
21

नागपूर,दि.01-‘वेतन आयोग तसेच, नोकरीतील बढतीतून आलेल्या नवश्रीमंतीमुळे दलित समाजाने व्यक्त होणे सोडून दिले आहे. एकेकाळी राज्यातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच, राजकीय चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या या समाजाची अभिव्यक्ती गोठली आहे. बौद्ध व पूर्वाश्रमीचा महार समाज सुस्तावला आहे. दलित समाज कुठे व्यक्त होतानाच दिसत नाही, कुठेच काही बोलताना दिसत नाही’, अशी खंत नाट्य व स्तंभलेखक संजय पवार यांनी व्यक्त केली.
कवी केतन पिंपळापुरे स्मृती आंबेडकरी प्रतिभा गौरव पुरस्काराने संजय पवार यांना सोमवारी सन्मानित करण्यात आले. सीताबर्डी येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नाटककार प्रेमानंद गज्वी, चित्रकार प्रमोदबाबू रामटेके, अॅड. विमलसूर्य चिमणकर, केतकी केतन पिंपळापुरे यांची प्रमुख उपस्थित होती.