ओबीसी महासंघाच्या क्रिमिलेयरसंबधी पुस्तकाचे प्रकाशन

0
8

नवी दिल्ली,दि.11- संविधान क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या द्वितीय महाअधिवेशनात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने ओबीसींच्या क्रिमिलेयर व नाॅन क्रिमिलेयरसंबधी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.या पुस्तकाचे प्रकाशन महाधिवेशनाचे स्वागताध्यक्ष केद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहिर,खासदार शरद यादव,महासंघाचे राष्ट्रीय संयोजक प्रा. बबनराव तायवाडे, महासंघाचे राजकीय समन्वयक डॉ. खुशालचंद्र बोपचे,महाराष्ट्राचे पशुसवंर्धंन मंत्री ना. महादेव जानकार,खासदार हुकुमदेव नारायण देव यादव,भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले,हरियाणाचे खासदार राजकुमार सैनी,माजी खासदार व्ही.हनुंतराव,माजी खासदार एस कारवेंद्रम,आमदार हरिभाऊ राठोड,आमदार डाॅ.परिणय फुके,आमदार विजय वड्डेटीवार,आंध्रप्रदेशचे आमदार आर कृष्णम,माजी आमदार सेवक वाघाये,पुर्व कुलपती पी सी पतंजली,कृष्णँया गौंड,श्रीनिवास गौड आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदर पुस्तकाचे लेखन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा.शेषराव येलेकर यांनी केले आहे.या पुस्तकात क्रिमिलेयर व नाॅन क्रिमिलेयरसबंधी शासन निर्णयासह इतर माहिती देण्यात आली आहे.या कार्यक्रमाचे संचालन अवंतिका लेकुरवाळे यांनी केले.