नरभक्षी वाघिणीने केली शिकार

0
14

नागपूर,दि.11 –:नरभक्षी वाघिणीने दोन दिवस कावडीमेट परिसरात धुमाकूळ घातला आहे. त्यातच या वाघिणीने पुसागोंदी शिवारात एका वासराची शिकार केली. नरभक्षी वाघिणीला बोर व्याघ्र प्रकल्पात सोडल्यानंतरची शिकारीची ही पहिली घटना आहे. आधीच नरभक्षी वाघिणीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असताना वासराच्या शिकारीमुळे पुन्हा दहशत निर्माण झाली आहे. या वाघिणीला बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यासही नागरिकांनी सुरुवातीला विरोध केला होता. मात्र विरोधानंतरही वाघिणीला तेथेच सोडण्यात आले. त्यात ही घटना घडली. दरम्यान, वाघिणीच्या संरक्षणासाठी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स आणि वन विभागाचे ४० जवान कावडीमेट परिसरात दाखल झालेले आहेत.ब्रह्मपुरी परिसरात धुमाकूळ घालून अनेक नागरिकांवर हल्ला करून त्यांना ठार करणाºया नरभक्षी वाघिणीला अलीकडे बोर व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते