दुष्काळी परिस्थिती बघता १०० टक्के अनुदानावर हवे रब्बीसाठी बियाणे

0
11

गोंदिया,दि.24: जिल्हा हा भात उत्पादक जिल्हा असून जिल्ह्यात सरासरी १,८८,००० हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात भात पिकाची लागवड करण्यात येते. खरीपमधील ९८ टक्के क्षेत्रावर केवळ भात पिकाची लागवड होते. खरीप हंगाम २०१७ मध्ये जिल्ह्यात सरासरी पर्जन्यमानाच्या केवळ ५२ टक्के पाऊस सप्टेंबर महिन्यापर्यंत झालेला आहे.
जिल्ह्यात सरासरी ३० टक्के क्षेत्रावर (अंदाजे ५०४०० हेक्टर) क्षेत्रावर हलक्या (अरली व्हेरायटी) ची लागवड करण्यात येते. या प्रकारच्या धानाकरिता खरीप हंगामाच्या सुरवातीच्या काळात पुरेशा प्रमाणात पाऊस पडणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून वेळेवर लागवड करता येते. परंतु खरीप २०१७ या हंगामात गोंदिया जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडल्याने टाकण्यात आलेल्या रोपाची (खार) पुनर्लागवड करण्याकरिता उशीर झाला. त्यामुळे रोपांचे वय वाढल्याने उत्पन्नामध्ये प्रचंड प्रमाणात घट येऊ शकते. हलक्या धानाच्या एकूण क्षेत्रापैकी केवळ २५ टक्के क्षेत्रावर ज्यांच्याकडे पर्यायी qसचनाची सोय आहे. त्यांच्याकडील उत्पन्न किमान चांगल्या प्रमाणात येऊ शकते. पण उर्वरित ७५ टक्के (४२,३०० हे.) क्षेत्रावर १०० टक्के नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात जवळपास ७० टक्के (१३, १६०० हे.) क्षेत्रावर भारी व मध्यम धान (लेट अ‍ॅण्ड मीडियम व्हेरायटी) ची लागवड करण्यात येते. जवळपास १५ टक्के (१९,७४०) क्षेत्र हे नर्सरीचे वय जास्त झाल्याने लागवड न केलेले व ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागवड झालेले क्षेत्र आहे. ज्यापासून १०० टक्के नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशाप्रकारे जिल्ह्यात हलक्या धानाचे ४२,३०० हे.मध्यम व भारी धानाचे १९७४० हे.असे एकूण ६२,०४० हे. नापेर qकवा उत्पन्न न येणारे क्षेत्र असल्याने तिथे १०० टक्के नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ६२,०४० क्षेत्रावर झालेल्या खरीपमधील नुकसानीनंतर शेतकèयांना रब्बीमध्ये पर्यायी पीक म्हणून रब्बी हंगामामध्ये १०० टक्के अनुदानावर कमी कालावधीच्या पिकांचे बियाणे उपलब्ध करून दिल्यास उदा. लाखोळी, उडीद, जवस तसेच पारंपरिक पद्धतीने होणारे हरभरा किंवा गहू यांचे बियाणे उपलब्ध करून दिल्यास जमिनीतील (रेसीडूअल मॉईस्टर) ओलावाचा उपयोग होऊन किमान रब्बी हंगामात शेतकèयास चांगले पीक घेता येईल. त्यामुळे आर्थिक नुकसान कमी होईल. सलगच्या मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात गहू व उडीद पिकाची यशस्वी लागवड केली जाते. तरीपण सदर पिके जर खालील वेळापत्रकानुसार लागवड केली तर हमखास उत्पादन मिळण्याची शक्यता आहे.
लाखोळी, उडीद गहू हे पीक ऑक्टोबर महिन्यात पेरणी करण्यात यावी तसेच जवस व हरभरा या पिकांची नोव्हेंबर मध्ये पेरणी केल्यास उपयुक्त ठरेल. त्याकरिता ३०,००० हे.क्षेत्राचे बियाणे लाखोळी, उडीद व गहू पिकासाठी उपलब्ध करावे व ३२,००० हे. करिता हरभरा व जवस पिकांचे बियाणे १०० टक्के अनुदानावर उपलब्ध करून द्यावे. नुकसान सर्वांत जास्त क्रमवार तिरोडा, देवरी, सालेकसा, आमगाव व त्यानंतर कमी नुकसान सडक अर्जुनी, गोरेगाव, गोंदिया, मोरगाव अर्जुनी असे आहे. अशा परिस्थितीमध्ये कृषी विभागाचे अधिकारी व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी यांनी पुढाकार घेऊन मागासलेल्या जिल्ह्यात जेथे आदिवासी व अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात फक्त शेतीवर अवलंबून आहेत अशावेळी लवकरात लवकर पर्यायी पीक म्हणून बियाणे उपलब्ध करण्याची सोय करावी असे वाटते.