नक्षलपीडित कुटुंबियांनी रॅलीतून दिला शांततेचा संदेश

0
13

गडचिरोली,दि.2 – शहरातील मुख्य इंदिरा गांधी चौकात जिल्हयातील ३५० ते ४०० नक्षलपीडित व शहिद कुटुंबीयांनी गांधी जयंतीच्या पर्वावर सोमवारी गडचिरोली शहरात अहिंसा  रॅली काढली. नक्षल्यांनी आदिवासींच्या केलेल्या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद मुर्दाबाद च्या घोषणा देत धरणे आंदोलन करुन व रॅली काढून नक्षल्यांकडून होणाऱ्या त्रासाबाबत तसेच पिळवणुकीबाबत तहसीलदाराना निवेदन दिले. देशात एखाद्या व्यक्तीचा खून झाला तर देशभरातील विचारवंत आठवडाभर चर्चा करतात. येथे ४९१ निष्पाप आदिवासी बांधवांचा खुन करुनही तथाकथित विचारवंतांना आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत का? असा प्रश्न नक्षलपिडीत कुटुंबियांनी निवेदनामध्ये केला आहे. तसेच मानवाधिकार आयोगाला आमचे दु:ख व अश्रु दिसत नाहीत. आमच्या १५ वर्षाच्या मुलामुलींच्या हाती बळजबरी शस्त्र देवून देशविघातक कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्या या नक्षल विचारवंतांना प्रश्न विचारण्याचे धाडस तथाकथित मानवाधिकार रक्षक का करत नाहीत? असाही प्रश्न नक्षलपिडीत कुटुंबियांनी केला आहे.