गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा

0
39

नागपूर,दि.15-अखिल भारतीय भोयर पवार महासंघ नागपूर तर्पे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचा जयंती पर्यावर सोमवार २ ऑक्टोबर, २0१७ ला सकाळी ११ वा. समाजातील गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ समाजसेवी नागरिकांचा सत्कार सोहळा समाजभवन पवार नगर हुडकेश्‍वर रोड नागपूर येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद््घाटन डॉ. खुशाल बोपचे, अध्यक्षस्थानी टी.डी. बिसेन, क्षत्रिय पवार, प्रमुख पाहुणे डॉ. हेमलता डहारे, लेखसिंह राणा, प्रदीप कालभोर, डॉ. अनिल कडवे, गुलाबराव बोवाडे, कृष्णा डोबाळे, रमेश टेंभरे, मनोहर कटरे, क्षत्रिय पवार आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी समाजाची वार्षिक पत्रिका वाटचाल अंक २0 चे विमोचन करण्यात आले. तसेच महिला मंडळातर्फे रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रण युवक आघाडीतर्फे दंत, नेत्र, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते समाजातील गुणवंत विद्यार्थी आकांशा विजयकुमार चौधरी, चिराग पवन राूत, हिमांशू शंकर डिगसे, अभिषेक जगदीश गवधने, वृषाली शकरराव पठाडे, विसाल रमेश खवशी, सेजल प्रवीण बिसेन, रुतुजा राजेश घागरे, यश् प्रकाश धारपुरे, उमंग डोबले, मैत्रेय चोपडे आदी विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तसेच युवक आघाडीतर्फे दंत, नेत्र, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवकांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. कार्यक्रमाचे संचालन अंजली देवासे यांनी तर आभार महासंघाचे सचिव मोरेश्‍वर भावे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकरराव चोपडे, नामदेवराव पराडकर, शंकरराव पाटेकर, सुभाष पाठे, र्शावण फरफाडे, मारोतराव कडवे, विजय पराडकर, हरिभजन धारपुरे, प्रभाकर डोंबले, मोहन हजारे, रामेश्‍वर चोपडे आदिंनी पर्शिम घेतले.