नागरिक वाचन संस्कृती विसरले -चेतन भैरम

0
9
लाखनी,दि. १६ : -ग्रंथालयात विविध प्रकारचे उपक्रम साजरे करुन संस्कृती टिकून ठेवण्याचे काम सुरु आहे. आपल्या ज्ञानाची द्वारे ग्रंथालय चळवळीमुळे व्यापक झाली आहेत. या विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या साधनांमुळे विद्यार्थी आणि नागरिक वाचन संस्कृती विसरले आहे. फेसबुक आणि सोशल मीडियाचा अतिरेक झाल्याने डोळ्यांना आजाराचा सामना करावा लागत असल्याचे विचार भंडारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांनी व्यक्त केले.
वाचन संस्कृती टिकावी म्हणून वाचन प्रेरणा दिन वाचनालयात साजरा करण्यात आला. मला विश्वास वाटतो की, अशा प्रकारच्या उपक्रमातून सांस्कृतिक चळवळ आणि वाचन चळवळ जिवंत आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शनी सादर केलेली होती त्यातील ग्रंथ दर्जेदार होती. वाचनालयाने भंडारा जिल्ह्यातील लेखक आणि ग्रंथ यांचे वेगळे विभाग तयार करावे असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून माजी आमदार हेमकृष्ण कापगते म्हणाले.
मिसाईल मॅन डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानी माजी आमदार हेमकृष्ण कापगते, चेतन भैरम, वाचनालयाचे अध्यक्ष छबिलाल रहांगडाले, कार्यवाह अजिंक्य भांडारकर, ऍड कोमलदादा गभणे, वाल्मिक लांजेवार उपस्थित होते. यावेळी वाचनालयाचे लिपिक विजय चेटूले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला. वाचनालयातर्फे त्यांना भविष्य धनादेश निधी देण्यात आला.कार्यक्रमात स्नेहल वंजारी, पंकज भिवगडे, मनोहर बोकडे, सुधाकर देशमुख, हरीभाऊ निर्वाण, हुकराम गायधनी, भुवनेश्वरी कमाणे, महेंद्र मिरगे यांना वाचन प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अजिंक्य भांडारकर, संचलन बारस्कर तर आभार दिक्षिता बावनकुळे हिने मानले.