राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ गडचिरोली तालुका अध्यक्षपदी सुरज डोईजळ

0
15

गडचिरोली,दि. १६ :- राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून ओबीसींचा लढा सुरु ठेवण्यासाठी देशभर कार्य सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यापर्यंत राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपले जाळ विस्तार करीत आहे.त्याच कळीमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गडचिलोरी अध्यक्षपदी सुरज डोईजळ यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे युवा गडचिरोली जिल्हाध्यक्ष रुचित वांढरे यांनी डोईजळ यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड केली असून गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाजावर सर्वात जास्त अन्याय झाल्याने  घटनात्मक अधिकार मिळवून घेण्याकरिता संघटन बांधनीचे काम हाती घेण्यात आल्याचे वांढरे यांनी म्हटले आहे.