चांगोटोला येथे बळीमहोत्सव उत्साहात साजरा

0
27

गोरेगाव,दि.22- कृषीसंस्कृतीचा संरक्षक बळीराजा स्मृती व गौरव दिवसाचे आयोजन ओबीसी सेवा संघ व बळीमहोत्सव समिती चांगोटोला द्वारे करण्यात आले होते.शेतकर्यांचा सांस्कृतिक प्रतिक असलेल्या बळीराजाच्या छायाचित्रासमोर सामाजिक कार्यकर्ता भाष्कर काठेवार यानी ओबीसी सेवा संघाचे राज्यउपाध्यक्ष सावन कटरे यांच्या अध्यक्षतेखाली दीप प्रज्वलीत केले.याप्रसंगी पोलिस पाटील श्रीमती रशिलाताई येळे,खांडाळकर,घनश्याम राऊत,शैलेस बिसेन,चौकलाल येळे,खुमराज नागोसे,माधोराव फाये,योगराज पटले,ललित येळे,कैलास बिसेन,सुनिल येळे,सोनू पटले,प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.
बळीराजाचा विजय असो,  ईडा पिडा टाळूया-बळीचे राज्य आणू या,  या जय घोषात महोत्सवाची थाटात सुरवात झाली.बळीराजा हा शेतकर्यांचे प्रेरणास्थान असून त्यांच्या राज्यात शेतकरी सुखी व समृद्ध होता.पण आज स्वतंत्र भारतात शेतकरी आत्महत्या करित असून त्याला देशोधडीला लावण्याचे कार्य आजपर्यतच्या राज्यकर्तावर्गाने केले आले.तरी बळीराजाच्या वारसदारांनी खचून न जाता परिश्रमाने आधूनिक शेती करावी व बटू वामनी विचाराच्या शाषक वर्गाविरूध्द संघर्ष करण्यासाठीचे सज्ज होण्याचे आवाहन पाहूण्यांनी केले.
अध्यक्षीय  भाषण करतांना सावन कटरे यांनी पौराणिक व आधुनिक दाखले देत बळीराजाच्या राज्यव्यवस्थेवर सविस्तर मार्गदर्शन केले.नऊ खंडाच्या राज्यव्यवस्थेत खंडोबा,ज्योतिबा,मसोबा या प्रशासकिय यंञणेच्या  देखरेखीत शेतकर्यांचे राज्य बलशाली राज्य उभारले.परकिय शञूना बळीराजाला समोरा समोर युध्दात हरवणे शक्य झाले नाही. तेव्हा आर्यांचा मोरक्या असलेला बटू वामन याने कपटाने बळीराजाला मारले व तिन पावलांच्या भाकड कथा रचून प्रजेला मुर्ख बनवले.पण आपल्या शेतकरी भगीनींनी दरवर्षी बळीराजाचे स्मरण दिवे लावून ,आपल्या भावांना ओवाळनी घालत “ईडा पिडा टळू दे-बळीचे राज्य येवू दे” या घोषणेसह आज ही बळीराज्याची वाट बघत आहेत.”जिस समाज का राजा नही होता,वह समाज कभी ताजा नही होता ” या राजर्षी शाहू महाराजांच्या संदेशाची आठवण करित आज शेतकरी दारिद्रय व आत्महत्येच्या दारात खितपत का पडलेला आहे ?याची कारणमिमांसा करित आजचे शेतकरी विरोधी धोरणच सांगतात की वामनी विचारांचे राज्य अस्तित्वात आहे.तेव्हा बळीराजाच्या वारसदारांनी आपल्या मुलांच्या शिक्षण,रोजगार,आरोग्य साठी संघर्ष ऊभारून बळीराज्य निर्मितीसाठी कार्य करावे.तेच खरया अर्थाने बळीराजाला अभिवादन ठरेल असे विचार मांडले.संचालन शाम फाये यांनी केले तर रामकृष्ण कटरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.शेतकरीबांधवांची उपस्थिती व सहकार्य मोलाचे ठरले.सर्वांत प्रेरणादायी व आशावादी वातावरण निर्माण झाले.