पाठक यांच्या कथासंग्रहाची निवड

0
14

नागपूर,दि.२१ः~रसिकराज या साहित्यीक आणि सांस्कृतीक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करित असलेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य निर्मिती स्पर्धेत ज्येष्ठ पत्रकार , राजकीय विश्लेषक आणि साहित्यीक अविनाश पाठक लिखीत डावपेच या राजकीय कथासंग्रहाची उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कारासाठी निवड झाली आहे. रोख रकम,सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.आपल्या राजकीय पत्रकारितेच्या ४० वर्षाच्या काळात अविनाश पाठक यांना राजकीय वर्तुळातील आतल्या गोटात संचार करण्याची संधी मिळाली. या संचारात अनुभवता आलेल्या विविध घटना आणि प्रसंगांवर आधारीत राजकीय कथालेखन पाठकांनी हाती घेतले. त्यांच्या या कथांचे वाचकांनी चांगलेच स्वागत केले. त्यातील निवडक सहा कथा डावपेच या कथासंग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.डावपेच या कथासंग्रहाला यापूर्वी ग्रंथालय भारतीचा पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे.अविनाश पाठक यांचे डावपेच हे आठवे पुस्तक असून यापूर्वी विविध विषयावर त्यांची ७ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना यापूर्वी विविध प्रतिष्ठीत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.रसिकराजचा हा पुरस्कार २९ नोव्हेंबर रोजी नागपुरात आयोजीत समारोहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.