ज्येष्ठ साहित्यिक डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांना जीवनगौरव पुरस्कार

0
14

जयसिंगपूर,दि.22ः- येथील ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय, जयसिंगपूर आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एस. के. पाटील ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, गल्ली क्रमांक ०९, जयसिंगपूर येथे गुरुवार दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ रोजी सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी (सांगली) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.

ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय, जयसिंगपूर आणि कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर या संस्था मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गेली अनेक वर्षे विविध उपक्रमांद्वारे प्रयत्नशील आहेत. लेखन आणि वाचनाची गोडी लागावी याकरिता ज्येष्ठ नागरिकांसाठी लेखन आणि अन्य साहित्यविषयक स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशी माहिती ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश भाऊ होरे यांनी दिली.

प्रत्येक महिन्याच्या चौथ्या गुरुवारी एका ज्येष्ठ साहित्यिकाला सन्मानित करण्यात येते. सांगली येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांची कविता, कथा, ललित, आरोग्य अशा विविध विषयांवर पाच पुस्तके प्रकाशित झाली असून; त्यांच्या भारतीय साहित्यातील योगदानाबरोबरच आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेवून त्यांच्या विशेष सेवेबद्दल जयसिंगपूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बी. ए. शिखरे यांच्या शुभहस्ते डॉ. व्यंकटेश रामचंद्र जंबगी यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रंथालयाच्या नवीन लोगोचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. तरी साहित्यप्रेमींनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे प्रायोजक दत्तात्रय रामचंद्र हेरेकर यांनी केले आहे.