माडग्याळ येथे व्याखान व पुरस्कार वितरण सोहळा रविवारला

0
12

_*विश्वरत्न सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत पुरस्कार वितरण सोहळा व व्याख्यानमाला*
सांगली,दि.२४ः भारतीय संविधान दिन26 नोव्हेंबर रोजीच्या68व्या गौरव दिनानिमित्त व थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मुर्तीदिनानिमित्त विश्वरत्न सामाजिक बहुउद्देशिय सेवाभावी संस्था माडग्याळ तालुका जत जिल्हा सांगली च्या वतीने जत येते साईप्रकाश मंगल कार्यालय च्या सभागृहात विविध क्षेत्रातील सामाजिक,आरोग्य विषयी,क्रिडाविषयी,शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्ती चा संस्थेच्या वतीने सत्कार होणार आहे .
तसेच यावेळी संविधान दिनानिमित्त व्यख्यानमाला आयोजित केले आहे.संविधानावर आधारित मार्गदर्शन प्र.कुलगुरू मुंबई विध्यापीठ माननीय डॉक्टर व्ही. एन.मगरे सर हे करणार आहेत.या कार्यक्रमासाठी प्रमुख उदघाटक म्हणून माननीय व्ही.एन मगरे प्रभारी कुलगुरू मुंबई विद्यापीठ तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सुमनताई पाटील आमदार तासगाव जिल्हा सांगली हे राहणार आहेत.
ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विक्रदादा सावंत जिल्हा परिषद सदस्य, सरदार पाटील जिल्हा परिषद सदस्य, महादेव पाटील जिल्हा परिषद सदस्य, माननीय राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना, सुरेश भाऊ पाटील,डी सि सी संचालक सांगली,तसेच प स सदस्य विष्णू चव्हाण व श्रीदेवी जावीर, आकाराम मासाळ-माजी समाजकल्याणसभापती,उपस्थित राहणार आहेत .
हा कार्यक्रम साई-प्रकाश मंगल कार्यलयाच्या सभागृहात सकाळी 12 वाजता होणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी सर्वानी उपस्थित राहावे असे संस्थेचे अध्यक्ष्या सौ वंदना काटे यांनी आव्हान केले आहे