सावरटोल्यातील ‘व्हिलेज गॉट टॅलेंट’मध्ये ग्रामीण कला-गुणांचे दर्शन

0
10

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.27ः-  गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला या छोट्याशा गावात टीव्ही वृत्तवाहिणीवरील ‘इंडिया गॉट टेलेंट’ या स्पर्धेच्या पातळीवर आयोजित ‘व्हिलेट गॉट टेलेंट-ग्रांट फिनाले’ स्पर्धेत ग्रामीण व शहरी भागातील कलावंतांनी सिनेसृष्टीतील सेलिब्रेटिजच्या उपस्थितीत आपल्या कलागुणांचे दाखविलेल्या कौशल्यगुणांनी भारावून टाकले. २४ नोव्हेंबर रोजी खतरा नाट्य मंचच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यासाठी उपअभियंता सुनिल तरोणे,किशोर तरोणे व डाॅं.पिंकू मंडल यांच्या चमूने गेल्या दोन तीन महिन्यापासून त्यासाठी परिश्रम घेतले होते.या आधीच्या स्पर्थेतून त्यांनी चांगल्या कलावंताची निवड करुन हा कार्यक्रम पार पाडला.
या स्पर्धेला प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित, पूर्वी भावे, ज्युनीयर जानी लिव्हर, भूषण जाधव, लावणी स्टार पूनम पाटील, गायक मिलिंद भोसले, रक्षंदा बांबुले याच्यासह इतर १७ सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.या कार्यक्रमाच्या उदघाटनाला प्रभारी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे,गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे,सभापती पी.जी.कटरे,जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.शाम निमगडे,जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,मनोहर चंद्रिकापुरे,रमेश चुर्हे,डी.यु.रहागंडाले यांच्यासह गावातील व तालुक्यातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

यावेळी तेजस्विनी पंडीत यांनी, गाव जरी लहान असले तरी मोठय़ा शहरात देखील असा मंच सहजासहजी उपलब्ध होत नसल्याचे सांगत या आयोजनाचे कौतुक केले. पूर्वी भावे हिने भारत हा शेवटी खेड्यांचा देश आहे. गावातील गुणवत्ताच देश घडवितो हे या मंचावर तरूणांनी सिद्ध करून दाखविले आहे. दरम्यान, ज्युनिअर जॉनी लिव्हर यांनी विविध नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून उपस्थितांचे मनोरंजन केले. टीव्हीवरील विविध वाहिण्यावरून विविध कलाप्रकारातील स्पर्धा आपण नेहमीच पाहतो. त्यातील कलावंतांचे कौतुक करतो. यातूनच आपल्यालाही असा मंच मिळावा, अशी अपेक्षा ग्रामीण भागातील कलावंतांमध्ये निर्माण होते आहे. असाच मंच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरगाव या छोट्याशा गावातील ‘खतरा नाट्य मंच’ने गेल्या पाच वर्षापासून जिल्ह्यासह परिसरातील भंडारा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर येथील ग्रामीण कलावंतांना उपलब्ध करून दिली आहे. कलाप्रेमी व सिनेसृष्टीला क्षेत्रातील ग्रामीण व शहरी कलावंतांच्या कलागुणांची ओळख मिळवून देण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन मंचातर्फे करण्यात येत आहे. स्पर्धेत जिल्ह्यातीलच ‘डी ट्रिक्स’ या ग्रुपने ‘बेटी बचाव’ या भूमिकेवर नृत्य सादर करून प्रथम पुरस्कार, नुपूर वाढई व जान्हवी शिवणकर यांच्या लावणीला व्दितीय आणि विशाल बावणे या कलावंताने तृतीय पुरस्कार पटकाविला. या स्पध्रेत गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्य़ातील कलावंत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, स्पध्रेच्या रात्री जिल्ह्यातील निचांक तापमान असताना देखील या गुलाबी ठंडीत जवळपास पाच हजार कलाप्रेमींनी स्पध्रेत आनंद घेत कलावंतांचे कौतुक केले. आयोजनासाठी एसके ग्रुप व खतरा नाट्यमंचच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.