जवाहरनगर येथे झाडीबोली साहित्य समेंलन २३ डिसेबंरला

0
22

बंडोपंत बोढेकर संमेलनाध्यक्ष तर महेश टेंभरे स्वागताध्यक्ष .

भंडारा,दि.१८:- तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्था,महात्मा गांधी अभ्यास केंद्र द्वारा झाडीबोली साहित्य मंडळाचे रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलन येत्या २३ व २४ डिसेंबर २०१७ रोजी जवाहरनगर पेट्रोलपंप जवळील आर्ट कामर्स महाविद्यालयात होऊ घातलेले आहे.या संमेलनाचे अध्यक्षपदी कवी,समीक्षक तथा ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची तर स्वागताध्यक्षपदी महेश गौरीशंकर टेंभरे यांची निवड करण्यात आलेली आहे.दि.२३ डिसेंबर ला दुपारी १ वाजता अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे हस्ते उद्घाटन होईल .याप्रसंगी भारतीय लोककला महासंघ अलाहाबाद चे अध्यक्ष अतुल यदुवंशी , भवई लोकनाट्याचे विशेषज्ञ मोतीभाई नायक गुजरात ,राष्ट्रीय बालगोष्टी चे आयोजक उदय किरोला अलमोडा उत्तराखंड ,डाँ .अनिल नितनवरे भंडारा ,डाँ .तीर्थराज कापगते नागपूर आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.तत्पुर्वी दु.११ वाजता आर्डनन्स फँक्टरी जवाहरनगर गेटपासून ते संमेलन स्थळापर्यत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे.त्याचवेळी संमेलनाचे ठिकाणी लोककलाकाराची मंडई होईल .उद्घाटन प्रसंगी मंडळाचे केंद्रीय अध्यक्ष डाँ .हरिश्चंद्र बोरकर ,सचिव राम महाजन,डाँ .गुरूप्रसाद पाकमोडे,मधुसुदन दोनोडे,सर्व माजी संमेलनाध्यक्ष ,सर्व जिल्हाप्रमुख ,प्राचार्य डाँ .अजय मोहबंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने एकूण २५ ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल .तसेच डाँ .घनश्याम डोंगरे संशोधन पुरस्कार मनोहर नरांजे यांना,नाथ घरडे कथा पुरस्कार मधुसुदन पुराणिक यांना,म.शि.गहाणे एकांकिका पुरस्कार मृणाल शिवनकर यांना,नीलकंठ कटकवार काव्य पुरस्कार वासुदेव राघोर्ते यांना प्रदान करण्यात येईल .उद्घाटन समारंभानंतर तुम्हाला आमचा पाठींबा या पहिल्या परिसंवादात कुसूम अलाम,ओमप्रकाश शिव,मनिषा साबळे,प्रकाश वहाणे,चंद्रशेखर वाडेगावकर,नारायण निखाते इत्यादी वेगवेगळ्या साहित्य मंडळाचे सदस्य आपले विचार प्रकट करतील.अध्यक्षस्थानी हिरामण लांजे असतील.तिसरा परिसंवाद माझी आवडती झाडीकविता या विषयावर असून महाविद्यालयाचे विद्यार्थीवर्ग यात विचार प्रकट करतील.अध्यक्षस्थानी डाँ .राजन जयस्वाल असतील.रात्री ८ वाजता चौथ्या सत्रात झाडीकवीसंमेलन नरेश देशमुख यांचे अध्यक्षतेखाली होईल. सूत्रसंचालन डाँ .अश्विनी रोकडे,अश्विन खांडेकर करतील.दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता पाचव्या सत्रात माझे पहिले पुस्तक या परिसंवादात वासुदेव राघोर्ते ,चंद्रकांत लेनगुरे ,विजय मेश्राम ,इंद्रकला बोपचे सहभागी होतील.अध्यक्षस्थानी डाँ .हेमकृष्ण कापगते असतील .सहाव्या सत्रात चळवळीने आम्हाला काय दिले ? या परिसंवादात नरेंद्र नारनवरे,मिलींद रंगारी ,बापुराव टोंगे ,इंद्रकला बोपचे सहभागी होतील .अध्यक्षस्थानी अंजनाबाई खुणे असतील.सातव्या सत्रात अशी माझी झाडीबोली शाखा या परिसंवादात ना.गो.थुटे,डोमा कापगते ,पुष्पा कापगते ,देविदास इंदापवार ,डाँ .राज मुसने,सुबोध कान्हेकर इत्यादी सहभागी होतील .अध्यक्षस्थानी लखनसिंह कटरे असतील.दुपारी ११.३० वाजता समारोपीय कार्यक्रम महाराष्ट्र शाहिर परिषदेचे अध्यक्ष शाहिर दादा पासलकर पुणे,ज्येष्ठ कलावंत शाहिर अंबादास तावरे औरंगाबाद ,ज्येष्ठ साहित्यिक विजय जगताप इचलकरंजी,डाँ .शिवनाथजी कुंभारे गडचिरोली ,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल . आयोजन समितीचे सदस्य तथा स्थानिक शाखेचे डाँ . आर.टी.पटले ,प्रा.डाँ .जे.व्ही कोंटागले ,वसंत चन्ने ,डाँ .आर.आर.चौधरी , डाँ मनिष जी.टेभंरे, कोषाध्यक्ष प्रा.एम.एस.नाकाडे,  प्रा.बावणकर,प्रा.गोंडाने,प्रा.डाँ .मानकर,प्रा.साधना वाघाडे ,प्रा.डाँ .वंजारी,प्रा.डाँ .साखरवाडे ,प्रा.गणवीर,प्रा.डाँ .रविदास,प्रा.डाँ .बोरकर ,प्रा.डोहणे,प्रा.रहागंडाले आदी सदस्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहे.संमेलनाचा सर्वानी लाभ घ्यावा व सहकार्य करावे असे आवाहन तुलसी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डाँ .गौरीशंकर टेंभरे यांनी केलेले आहे.