तिरोडा पोलीस ठाण्यावर अदानीच्या कामगारांचा मोर्चा

0
11

तिरोडा,दि.१८ : मागील तीन महिन्यांपासून अदानी प्रकल्पाचे अदानी प्रकल्प कामगार श्रमिक संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनामुळे सतत येथे तनावाचे वातावरण असतानाच दोन दिवसापूर्वी अदानी प्रकल्पातर्फे कामगारांच्या मागण्या मान्य केल्याने आज, १८ डिसेंबर रोजी सुरळीत काम सुरू झाले असता सकाळी १० वाजताच्या दरम्यान अदानी येथील एका कंत्राटदाराने संघटनेचे सचिव ओमप्रकाश पटले यांना अश्लिल शिवीगाळ करून जीवेमारण्याची धमकी देऊन लाथाबुक्क्याने मारहाण केल्याने कामगारांमध्ये असंतोष पसरून कामगरांनी स्वयंस्फूर्तीने कामबंद आंदोलन करून मारहाण करणाºयास त्वरित अटक करा, या मागणीसाठी सुमारे दीड ते दान हजार कर्मचाºयांची तिरोडा पोलीस स्टेशनवर धडक दिल्याने सुमारे अडीच तास तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये कामगारांचे आंदोलन सुरू असताना गोंदियावरून शीघ्र कृती दलाचे कुमक आल्यावर या कामगारांना बाहेर काढण्यात यश आले.
मागील तीन महिन्यांपासून अदानी प्रकल्प कामगार श्रमिक संघ कामगारांच्या मागण्यांसाठी सतत सुरू असलेले आंदोलन दोन दिवसापूर्वी अदानी प्रकल्पातर्फे मागण्या मान्य करण्यात आल्याने आज, १८ डिसेंबर रोजी अदानी प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू झाले असता सकाळी १० वाजताच्या दरम्यान अदानी प्रकल्प कामगार श्रमिक संघटनेचे सचिव तसेच गुमाधावडा येथील सरपंच ओमप्रकाश पटले यांना अदानी येथील कंत्राटदार लिल्हारे यांनी ३० ते ३५ लोकांसह दोन चारचाकी व काही मोटारसायकलद्वारे आलेल्या जमावापैकी लिल्हारे यांनी ओमप्रकाश पटले यांना अश्लिल शिवीगाळ करून ‘तेरे तुकडे कर देंगे’ असे म्हणून कॉलर पकडून मारहाण केल्याने आपला जीव वाचविण्याकरिता अदानी प्रकल्पात पडाले असता त्यांच्या मागे धावून दगडफेक केली व ओमप्रकाश पटले अदानी प्रकल्पात गेले असता अदानी प्रकल्पाचे सी.पी. शाहू यांनी संघटनेचे पदाधिकाºयांना बोलावून झालेल्या प्रकाराबाबद आपण माफी मागतो असे सांगितले. परंतु संघटनेच्या पदाधिकाºयांनी ज्यांनी मारहाण केली त्यांनी माफी मागावी, आपण माफी का मागता, अशी भुमिका घेतली असता प्रकल्पातील कामगारांना हा प्रकार माहित होताच कामगारांनी स्वयंस्फूर्तीने कामबंद पाडून तिरोडा पोलीस स्टेशनवर धडक दिली. यामुळे तिरोडा पोलीस स्टेशन परिसरात सर्वत्र कामगारांच्या या धडकेमुळे भितीचे वातावरण पसले व हाच चर्चेचा विषय झाला असून तिरोडा पोलीस स्टेशनमध्ये अत्यल्प कर्मचारी असल्यामुळे पोलिसांना हा जमाव बाहेर काढता आला नाही. परंतु, सुमारे अडीच तासानंतर गोंदिया येथून शिघ्र कृती दलाचे पथक आल्यावर या जमावास बाहेर काढण्यात यश आले. अदानी प्रकल्प कामगार श्रमिक संघाचे सचिव व गुमाधावडा येथील सरपंच ओमप्रकाश पटले यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम २९४, ५०६, ३२३, ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला असून बातमी लिहीपर्यंत कुणासही अटक झाली नव्हती.