लयभारीः भाजपमधील खरी बिमारी

0
14

गोंदिया- जसजशा गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या, तसतशा गोंदिया जिल्हा भाजपमधील हालचालींनी सुद्धा वेग घेतला आहे. पक्षातील बच्चेपार्टी ही आता जुन्याजाणत्या नेत्यांवर आगपाखड करू लागली आहे. याउलट, जुने मात्र पक्षनिष्ठेचे तुणतुणेच वाजवत बसले आहेत. हल्ली गल्लीबोळातील कार्यकर्तेसुद्धा पांढरे सदरे घालून आता नेते म्हणून मिरवीत आहेत. शहरातील काहींना तर मोठे नेते झाल्याचा ताव चढल्याचे दिसत आहे.
परंतु, निष्ठावान व शिस्तप्रिय अशी बिरुदावली चिकटवलेली गोंदिया जिल्हा भाजप ही आता बेशिस्त नेत्यांच्या व संघटनमंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर ठरली आहे. ज्यांनी व्यक्तीपेक्षा पक्षाला महत्त्व असल्याचे वक्तव्य केले, त्यांचेसह काहींनी संघटनमंत्र्यांच्या व्यक्तीपुजेला जाहीररीत्या ‘कबूल हैङ्क म्हटल्याचे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला तर भाजपवर संघटनमंत्री व त्यांचे पुजक नेते ‘लय भारीङ्क ठरले, यात तिळमात्रही शंका उरली नाही. परिणामी, भाजपमधील खरी बिमारी ही लयभारी असल्याचे पक्षात खसखस सुरू झाली आहे.
या व्यक्तीपुजा प्रसंशक संघटनमंत्र्यांच्या दहशतीखाली गेली अनेक वर्षे गोंदियाची भाजप गुदमरत आहे. गल्लीबोळातही कार्यकर्ते जि.प. निवडणुकीसाठी पांढरे सदरे परिधान करून तयारीत आहेत. निवडून आल्यावर जनतेचे हेच खरे पाईक असल्याचा आतापासून देखावा आहे. गोंदिया-भंडारा लोकसभा निवडणुकीत खा. नाना पटोले निवडून आले खरे. पण ते लयभारीच्या नावासोबतच त्यांच्या दहशतीखाली चांगलेच दाबले गेले. यामुळे खासदार झाल्यानंतरही पटोलेंना पक्षात काय स्थान आहे, हे आता उघड आहे. त्यामुळेच त्यांचे डोकेही आता गरगरायला लागले आहे की काय, असे वाटू लागले आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर या लयभारी संघटनमंत्र्याने आपले फर्मान लाडक्या जिल्हाध्यक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काढले. बैठकीत कोणाला बोलवायचे आणि कोणाला वगळायचे हे जिल्हाध्यक्षांच्या मार्फत ते सांगू लागले आहेत. ज्या नेत्यांचे बोट धरून जिल्हाध्यक्षांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले आणि ज्यांनी या जिल्हाध्यक्षांना राजकारणाचे बाळकडू पाजले, एवढेच नव्हे तर इतरांच्या विरोधाचा सामना करून ज्यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळवून दिली होती, तेच शिवणकर आज पक्षाच्या कार्यक्रमात नको म्हणून तोंडी आदेश देत असल्याची खुली चर्चा आहे. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील जुन्या कार्यकत्र्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्याची एक श्रृखंलाच सुरू झाली होती. परंतु, कार्यकत्र्यांची नाराजी बघून विद्यमान मुख्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष यांनी निष्ठावान कार्यकत्र्यांना न्याय देत त्यांचे निलंबन रद्द केले. मात्र, जिल्हा कार्यकारिणी त्या मुख्यमंत्र्यांच्या व मावळत्या प्रदेशाध्यक्षांच्या निर्णयालाही आजही स्वीकारायला तयार नाही. हे कोणाच्या आदेशावरच होत आहे, हे बहुतेक ते व्यक्ती आणि पक्षाचे महत्त्व सांगणाèया लोकप्रतिनिधींना कळले नसावे, हीच खरी शोकांतिका आहे, असेच म्हणावे लागेल.
लयभारींनी कार्यकत्र्यांचे निलंबन का केले? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण लयभारींनी गोंदिया-भंडारा जिल्ह्यात सर्व आमदार मीच निवडून आणले, असा आव आणला आहे. पण त्यांची महत्त्वाची पतंग कोणी कापली, हे त्याला सुद्धा कळले नाही, असेच दिसते. लयभारीला असे वाटते की, आपल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य पसरले आहे. पण जेव्हा महाराष्ट्रात इतरत्र भाजपचे कोणी निवडून येत नव्हते, तेव्हा गोंदिया ते खामगावपर्यंत जे नेते निवडून येत होते, त्यात स्व.लक्ष्मणराव मानकर, हेमकृष्ण कापगते, राम आस्वले, प्रकाश मालगाये, चुन्नीभाऊ ठाकूर, डॉ. खुशाल बोपचे, खोमेश रहांगडाले, शिशुपाल पटले, हेमंत पटले, दयाराम कापगते,मधुकर कुकडे इत्यादी नेत्यांच्या परिश्रमामुळे भाजप भंडारा व गोंदिया जिल्ह्यात घट्ट मजबूत झाली. परंतु, या लयभारीच्या आगमनाने मात्र पक्षात गटबाजीने शिरकाव केला.
आमगावच्या बैठकीत झालेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त करताना आमदारांनी पार्टीत व्यक्तीपूजेपेक्षा पार्टीला महत्त्व द्यावे, असा उपदेश दिला. परंतु, आमदार महोदय या पक्षात येण्याआधी आपला इतिहास काय होता, हे दुसरे अजूनही विसरले नाहीत. आपण कुठल्या पक्षात होतात आणि कोणाच्या महापुजेनंतर आपल्याला उमेदवारी पावली, असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहेत. ज्यांनी आपल्या आयुष्यभर भाजपची सेवा केली, ज्यांना भाजप सोडण्याच्या विचाराचा साधा स्पर्श सुद्धा चुकूनही झाला नाही, अशा कर्मठ नेत्यांना वा कार्यकत्र्यांना आपण उपदेश देण्याइतपत महान केव्हा झालात? याचे आत्मqचतन आमदार महोदय आपण आधी करावे. तुमच्याच पक्षाच्या कार्यकत्र्यानुसार, निष्ठावंत तुम्ही की रमेश ताराम? ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षकार्यासाठी झिजविले आणि पराभव पचवत (तेही आज स्वतःला निष्ठावंत म्हणवणाèयांच्या कुरघोड्यांमुळे पदरी पडले होते) कार्य केले म्हणून उमेदवारीची आशा करणे हाच काय त्यांचा गुन्हा होता? असे अनेक प्रश्न सुद्धा लयभारीने तुमच्या तोंडून वदवून घेतले. लयभारीने आपल्या कपटबुद्धीने आपला वापर करून घेतला, हे सुद्धा आपण समजू शकले नाही. हीच खरी आपली व्यक्तीपुजा ठरली.
लयभारीची पूजा केली तर आपली जि.प. तिकीट पक्की, अशी समजूत असेल तर त्या ‘सबका साथ सबका विकासङ्क विधानाला काय अर्थ उरतो? गोंदिया जिल्ह्यात आल्यापासून लयभारींनी काय काय कारनामे केले, हे सामान्य कार्यकत्र्यांपासून लपून राहिले नाहीत.
या लयभारीनी म्हटल्यानंतर ते संगठनमंत्री म्हणतात. पण ते आल्यापासून भाजपमध्ये किती गट पडले, हे भाजपच्या कार्यकत्र्याला सुद्धा माहीत नाही. जर असेच चालत राहिले, तर जि.प.ची सत्ता जाण्याचे दिवससुद्धा आता दूर नाहीत.