नानांचे तर आता ना. ना.. ना…नानारे ऽऽऽ!

0
15

नाना आणि कार्यकत्र्यांत वारंवार qलकफेल…
कार्यकत्र्यांची खंतः वेळ देऊनही गैरहजर

गोंदिया- नाना म्हणजे खा.नाना पटोले… गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील सर्वांत लोकप्रिय, युवा आणि उमदे नेतृत्व. नाना म्हणजे गोरगरिबांच्या सुखदुःखात सदैव सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व. लोकहितासाठी स्वतःचे हित बाजूला सारत प्रसंगी आपल्या पक्षश्रेष्ठींशी दोनहात करणारे धडाडीचे नेते. आपल्या कार्यकत्र्यांवर अगदी जीव ओवाळून टाकणारा नेता. या भागातील जनतेच्या गळ्यातील ताईत म्हणजे नाना. समाजासाठी अहोरात्र एक करणारा नेता म्हणजे नाना. पण अलीकडे हे चित्र एकदम बदललेले. नानांनी खासदारकीची निवडणूक का जिंकली, त्यांची आपल्या लोकांशी जुळलेली नाळ एका झटक्यात तुटली. आमचे नाना एकदम कसे बदलले, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नानांचा चाहता आज उदास-हताश फिरताना दिसत आहे. तासन्तास नानांसाठी गर्दी करणारा त्यांचा चाहता वर्ग नाना आले की एकच कल्लोळ करायचा. नानांशी हस्तांदोलन करताच, नानांचे प्रेमाचे दोन शब्द कानावर पडताच अगदी श्रीमंतीचे आव आणणारा त्यांचा कार्यकर्ता आजही त्यांचा हात आपल्या पाठीवर पडावा म्हणून आसुसलेला आहे. पण त्यांचा लाडका नाना कोठे हरवला,या प्रश्नाचे उत्तरच त्यांना सापडत नसल्याने तो केविलवाणा झालाय.
चोवीसतास लोकांच्या गराड्यात वावरणाèया नानांच्या अवतीभवतीची गर्दी आता ओसरायला लागली. नाना आता स्वतः वेळ देऊन, गावात येऊनही नजीकच्या कार्यकत्र्याला पोरके करताहेत. कार्यकत्र्यात कमालीची उदासीनता पसरली आहे. सत्तेत असताना सुद्धा आपल्या माणसांसाठी नाना आक्रमक राहायचे. तेच नाना आता खासदार होताच मुके झालेच कसे, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. ओबीसींच्या हितासाठी ते नेहमी अग्रेसर राहायचे. आता तर ओबीसी हा साधा शब्दसुद्धा नानांच्या ओठावर येताना थरथरतोय. पक्षात राहून आंदोलन करणारे नाना आता लुळेपांगडे झाल्यासारखे पाहणे, हे त्यांचा कार्यकर्ता कसा सहन करू शकतो? ओबीसींच्या प्रश्नावर त्यांना कोणी मुकेबहिरे केले? ओबीसींच्या नावावर लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे फड मांडून विजयश्री खेचून आणली. मात्र, आता त्याच ओबीसींना पोरके होताना नानांनी घेतलेली भूमिका निश्चितच संशयास्पद आहे. वेळ देऊनही कार्यक्रमाला बुट्टी मारणे हे तर अलीकडे नित्याचेच. परिणामी, समर्थक तर नाराज आहेतच. पण विरोधकांच्या हातात नानांनी आयते कोलीत देऊन टाकले. तसेही यांच्याभोवती आपमतलबी कार्यकत्र्यांचा गराडा आहे. जशा गूळ संपला की माशा भूर्रर होतात, अशा महाभागांनी नानांना कुंपण केल्याचे दिसत आहे. हे षडयंत्र नानांच्या कसे लक्षात येऊ दिले जात नाही, हे कळायला मार्ग नाही. विशिष्ट वलय निर्माण करून नानांमधील लढाऊ बाणा नष्ट करण्याची तर ही खेळी नसावी ना, ही शंका आल्यावाचून राहत नाही. असे असेल तर तो दिवस दूर नाही, जेव्हा नाना अडगळीत दिसतील.
काँग्रेसपक्षात असताना प्रकाशझोतात आलेले नाना यांनी पुढे भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी-खासदारकी मिळवली. पूर्वी नाना पटोले शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात आक्रमक रहायचे. यामुळे पक्ष कोणताही असो, त्यांच्या शेजारी नेहमी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु, दिल्लीची हवा लागताच त्यांचे वलय कमीकमी होत जात असल्याचे वाटत आहे. पक्षांतर्गत गटबाजीचा फटकासुद्धा त्यांना चांगलाच बसला आहे. पूर्वी नानांच्या प्रतीक्षेत दिवसभर कार्यकर्ते, सामान्य नागरिक राहायचे. नाना पटोले खासदार असल्याने त्यांना भंडारासह गोंदिया जिल्ह्यात देखील वेळ द्यावा लागतो. त्यांचा चाहता वर्ग अद्यापही कायम आहे. त्यांना कार्यक्रमांचे नियंत्रण दिले जाते. नाना पटोले येण्याचे कबूलही करतात. परंतु, गावात राहूनदेखील नाना कार्यक्रमांना येत नाही, हे त्यांच्या चाहत्यांच्या हृदयाला चटका लावणारे आहे. एकीकडे ना.राजकुमार बडोले राज्याची जबाबदारी असूनही जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. कधी कधी तर ते राज्याचे मंत्री आहेत qकवा नाही, असा प्रश्न लोकांना पडत असताना केवळ कोरडे खासदार असलेले नाना मात्र जनतेपासून अंतर राखून कसे, याचे आश्चर्य आहे. बहुजनांना वगळण्यात येत असल्याचा ठपका पक्षातीलच काही कार्यकर्ते करत आहेत. मग, बहुजनांचे नेतृत्व करणाèया खासदारांनी स्वतः अशी नामुष्की का ओढवून घ्यावी, हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या चाहत्यांना आपला लढवय्या नाना हवाय! तोच जुना नाना, कोणाच्या धमक्यांना भीक न घालणारा आपला नाना!!