गुरुजींचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचावे

0
12

आमगाव : गुरुजींनी भवभूती शिक्षण संस्थेची स्थापना केली. परंतु त्यांचे कार्य फक्त या संस्थेपर्यंतच मर्यादीत नव्हते. त्यांच्या विचाराचा प्रचार व प्रसार नवीन पिढीपर्यंत व्हावा व कर्तृत्ववान पिढी निर्माण व्हावी असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी प्रतिपादन केले. बुधवारी (दि. ४) शिक्षणमहर्षी लक्ष्मणराव मानकर गुरुजी यांच्या जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.

उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय पुराम, आ. विजय रहांगडाले, आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. राजेश काशिवार, सत्कारमुर्ती राकेश शर्मा, नामदेव कापगते, मुकेश थानथराटे, भाऊराव उके, लक्ष्मण नाईक, श्रीराम बावनकर, माजी आमदार केशव मानकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेशबाबू असाटी, उपाध्यक्ष प्रमोद कटकवार, संचालक स.रं. अंजनकर, ढे.र. कटरे, रमेश कावळे, हरिहर मानकर, उर्मिला कावळे, लक्ष्मी नागपुरे, जयंती समारंभाचे संयोजक, डॉ. डी.के. संघी, प्राचार्य श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य एस.सी. हनुवते, कार्यकारी प्राचार्य ए.यु. बन्सोड उपस्थित होते.

गुरुजींच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी लक्ष्मणराव मानकर कॉलेज आॅफ पॉलिटेक्निकच्या कार्यशाळेचे उद्घाटन व भवभूती महाविद्यालयाच्या आवार भिंतीचे भूमिपूजन खा. नेते यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान शिक्षण, राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सत्कारमुर्तींचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना संघी परिवारातर्फे स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

उद्घाटनपर भाषणात खासदार नेते यांनी युवकांना दुरदृष्टी, सहनशिलता व जिद्द हे तीन मंत्र जोपासण्याचे आवाहन केले.

संचालन प्रा. उमेश मेंढे, प्रा. तोषीका पटले, शोभा येळे, अश्विनी जोशी, दिनेश राऊत यांनी केले. आभार डॉ. संघी यांनी मानले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.