भाजयुमोतर्फे ‘एक शाम शहीदों के नामङ्क कवी संमेलन २५ रोजी

0
12
गोंदिया,दि.२३ : भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा शाखेतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २५ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता ‘एक शाम शहीदों के नामङ्क कार्यक्रमातंर्गत कवी संमेलनाचे आयोजन सिव्हिल लाईन हनुमान चौकात करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री राजकुमार बडोले, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली करतील. यावेळी आ. डॉ. परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी खा. डॉ.खुशाल बोपचे, महामंत्री विरेंद्र अंजनकर, माजी आ.केशवराव मानकर, खोमेश्वर रहांगडाले, भेरसिंग नागपुरे, भजनदास वैद्य, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल, तिरोडा नगराध्यक्षा सोनाली देशपांडे, गोंदिया नप उपाध्यक्ष शिव शर्मा आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
संमेलनात, बरेलीचे कवी गौरी शंकर धाकड, बीनाचे कवी निधी निशंक, झांसीचे कवी संजीव दुबे, छपाराचे कवी मुकेश मनमौजी सहभागी होणार असून छिंदवाड्याचे व्यंगकार तरुण जैन हे सूत्रसंचालन करणार आहेत.या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, महामंत्री ऋषीकांत शाहू, पंकज सोनवाने, ललीत मानकर तसेच जिल्हा भाजयुमो पदाधिकाèयांनी केले आहे.