अर्जुनी मोरगावात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आज

0
12
अर्जुनी मोरगाव,दि.२३- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अर्जुनी मोरगावच्यावतीने बुधवार २४ जानेवारीला कार्यकर्ता मेळावा तसेच सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन दुपारी २ वाजता करण्यात आले आहे.मेळाव्याचे उदघाटन खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते होणार आहे.विशेष अतिथी म्हणून माजी आमदार राजेंद्र जैन,प्रदेश प्रतिनिधी तथा किसान सेल अध्यक्ष मनोहरराव चंद्रिकापुरे,जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे,राजलक्ष्मी तुरकर,किशोर तरोणे,गंगाधर परशुरामकर,केतन तुरकर,यशवंत परशुरामकर,भाष्कर आत्राम,जनार्धन काळसर्फे,सुधीर साधवानी,रतीराम राणे,नाजुका कुंभरे,हेमकृष्ण संग्रामे,नारायण भेंडारकर,नामदेव डोंगरवार,चित्रलेखा मिश्रा,भोजराम रहिले,राकेश लंजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्याला तालुक्यातील जनतेला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकपाल गहाणे,शिशुला हलमारे,योगेश नाकाडे यांनी केले आहे.