प्रत्येक घरातून संविधानाचे पारायण व्हावेः सत्यपाल महाराज                 

0
20

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.१८ः-ग्राम स्वच्छता निर्मल ग्राम व्यसनमुक्त समाज ,मानव धर्म ,स्त्री सक्षमीकरण,पर्यावरण संरक्षण,अंधस्रद्धा निर्मूलन या सारख्या विषयांना हात घातला.तसेच संविधानामुळे मानवाला हक्क मिळाले ,स्त्रीयांना सामाजिक समतेचा वारसा मिळाला . देश निर्मितीसाठी विकासाची संधी मिळाली ,अशा डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाचे महत्त्व प्रत्येक घरातील व्यक्तीला कळावे .यासाठी अतिशय कमी किंमतीत गोरगरीबांना संविधानाची प्रत शासनाने उपलब्ध करून द्यावी व त्यांचे प्रत्येक घरातून पारायण व्हावे,असे मौलिक विचार समाज प्रबोधनकार सप्तखंजीरीवादक सत्यपाल महाराज यांनी व्यक्त केले. अर्जुनी मोरगाव येथे आयोजित सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनातंर्गत रात्रीला आयोजित किर्तनप्रसंगी ते बोलत होते.

सत्यपाल महाराज यांनी समाजातील अनेक वाईट रूढी ,परंपरा यांचे  वाभाडे  काढत ,उपदेश करतांना सामान्य नागरिक राजकारणी ,भ्रष्ट अधिकारी यांचा  चांगलाच समाचार घेतला .राजर्षी शाहू महाराज , म्हात्मा फुले , डाँ.आंबेडकर यांचा विषयाचा प्रभाव त्यांच्या किर्तनातून दिसून आला.ते म्हणतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ,रमाई आंबेडकर  यांच्यामुळे आज ची स्त्री सुशिक्षित सामर्थ्यशाली झाली आहे .आज समाजात रामरहिमसारखे अनेक ढोंगीबाबा निर्माण झाले आहेत .त्यांच्या आहारी न जाता व्यक्तीने स्वबुध्दीने चांगल्या वाईटाची निवड करावी.काश्मीर मध्ये अतिरेकी कारवाया चालू आहेत.सिमेवर लढणा-या वीर जवानाची स्थिती अत्यंत वाईट होत चालली आहे.तेच देशाचे खरे रक्षक आहेत.सैन्यात गोरखा, राजपूत आदी बटालियन आहेत .मात्र एक तरी पुजारी बटालियन आहे का? देवा धर्माच्या मागे लागून अंधश्रध्देच्या ही आहारी जाऊ नका,मांत्रिकाच्या मागे लागू नका,संत तुकारामानी देव हा देवळात बसून तो माणसात शोधा असे सांगितले .तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात ,निर्मल ग्राम करा,स्वच्छता राखा,गाव हा देशाचा नकाशा असतो .गावावरून देशाची परीक्षा होत असते,स्त्रीयांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी मारली पाहिजे ,धनुर्धर विद्या मध्ये  इशा पवार या खेळाडूने सुवर्ण पदक मिळविले आहे.महिलांनो आपणाला कुणी होता आले नाही तरी निदान अनाथाची आई असलेल्या सिंधूताई सपकाळ व्हा.मानवा-मानवात सर्व धर्म समभावाची भावना रूजली पाहिजे,असा उपदेश सत्यपाल महाराजांनी केला.