आज निमगाव येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व उत्कृष्ट गोपालकांचा सत्कार

0
9

अर्जुनी/मोरगाव,दि.१८ :  तालुक्यातील निमगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जि.प.प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पशुसंवर्धन विभाग जि.प. व पं.स.अर्जुनी/मोरगाव यांच्या संयुक्त वतीने जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा राजस्व निधीमधून पशुपक्षी प्रदर्शन, संकरीत वासरांचा मेळावा व उत्कृष्ट गोपालकांचा सपत्नीक सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उदघाटन पालकमंत्री राजकुमार बडोले हे करतील. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष सीमा मडावी हया असतील. विशेष अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम राजा दयानिधी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जि.प.उपाध्यक्ष हमीद अलताफ अकबर अली, जि.प.पशुसंवर्धन समिती सभापती शैलजा सोनवाने, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, उपसभापती करुणा नांदगावे, जि.प.सदस्य रचना गहाणे तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.सदस्य कमल पाऊलझगडे, गिरीष पालीवाल, भास्कर आत्राम, किशोर तरोणे, मंदा कुंभरे, तेजुकला गहाणे, माजी जि.प.सभापती उमाकांत ढेंगे, पं.स.सदस्य पिंगळाबाई ब्राम्हणकर, होमराज कोरेटी, नानाजी मेश्राम, सुधीर साधवानी, जनार्दन काळसर्पे, रामलाल मुंगनकर, प्रेमलाल गेडाम, शिशुला हलमारे, नाजुका कुंभरे, आशा झिलपे, जयश्री पंधरे, अर्चना राऊत, जि.प.उपायुक्त डॉ.राजकुमार शहारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक, डॉ.अतुल डांगोरे, सरपंच विश्वनाथ बाळबुधे यांची उपस्थिती राहणार आहे. तरी तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ.व्ही.एस.गोंडाणे यांनी केले आहे.