पोलीस अधिकाऱ्यांकडून शहीद कुटुंबियांना आर्थिक मदत

0
25

गडचिरोली,दि.21ः- जिल्ह्यातील पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्याकडून तसेच विविध पोस्टे,उपपोस्टे,पोमके स्तरावर आपली सेवा बजावत असलेल्या सत्र क्रमांक ११३ च्या पोलीस उपनिरिक्षकांतर्फे शहीद कुटुंबातील गरजू व्यक्तीना प्रत्येकी रु 21000 ची आर्थिक मदत करण्यात आली.हा कार्यक्रम पोलीस अधिक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधिक्षक  महेंद्र पंडित,अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. हरि बालाजी,उपविभागीय पोलीस अधिकारी(अभियान)समीर साळवे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
यावेळी सत्र क्रमांक ११३ तर्फे मनोगत व्यक्त करताना पोलीस उपनिरीक्षक दाजी देठे यांनी सांगितले कि, माओवाद्याचा सामना करत असताना अनेक शूरवीर जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे.या वीर जवानांचे बलिदानाने त्यांच्या कुटूंबाचे होणारे नुकसान कधीही भरून निघू शकत नाही.आमच्या सत्र क्रमांक ११३ ने थोड्या प्रमाणात या कुटूंबाना आर्थिक मदत देऊ केली आहे.यामध्ये शहीद पालदेव सेडमेक यांच्या मातोश्री सरुबाई सेडमेक,शहीद श्रावण उसेंडी यांच्या मातोश्री मुक्ताबाई,शहीद बिरसाई आत्राम यांच्या पत्नी वनिताबाई आत्राम या विरांच्या कुटूंबातील व्यक्तीना आम्ही सर्वजण एकत्र येउन सर्वांतर्फे आर्थिक मदत करीत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अप्पर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी सत्र क्रमांक ११३ चे कौतुक करून त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सत्र क्रमांक ११३ चे पोलीस उपनिरीक्षक बसवराज माळी,अवधुत शिंगारे,युवराज घोडके,यश बोराटे, वर्षा नैताम,सुधा चौधरी,शेष मोरे,अविनाश ढमे,ऱाजेश गावडे हे उपस्थित होते.