आदिवासी वस्तीगृहातील अन्नात अऴ्या,विद्याथ्यार्चा जेवणावर बहिष्कार

0
20
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोंदिया: शहरातील सिव्हील लाइन परिसरात आदिवासी विद्याथ्र्यांचे शासकीय निवासी वस्तीगृह आहे. आज,
गुरुवारी सकाळी विद्याथ्र्यांना वाढण्यात आलेल्या जेवणात चक्क अळ्या असल्याचे दिसून आले. हा प्रकार नित्याचा झाला.
त्यामुळे ७४ च्या संख्येत असलेल्या विद्याथ्र्यांनी जेवणावर बहिष्कार घातला. त्यासह याठिकाणी विद्याथ्र्यांना मुलभूत
सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप विद्याथ्र्यांनी केला. यासंदर्भात आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने
गृहपालांना निवेदन देऊन तातडीने सुविधा पुरविण्यात याव्यात, जेवण पुरविणार्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी,
अशी मागणी केली.
शासनाच्या वतीने आदिवासी समाजातील विद्याथ्र्याची शैक्षणीक प्रगती व्हावी, याकरिता त्यांच्याकरिता विविध सोयी
सुविधांचा लाभ देण्यात येत आहे. मात्र, विद्याथ्र्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचत नसल्याची ओरड गेल्या कित्येक
वर्षांपासून सुरू आहे. शहरातील सिव्हील लाईन परिसरात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत मुलांचे निवासी
वस्तीगृह भाड्याच्या घरात सुरू आहे. याठिकाणी ७४ मुले वास्तव्यास आहेत. आदिवासी विद्याथ्र्यांना विविध सुविधा
पुरविण्यासंदर्भात शासनाचे नियम आहेत. परंतु, त्याकरिता येणारा निधी विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार घशात
घालत असल्याचा प्रकार नित्याचाच झाला. वस्तीगृहातील विद्यार्थी आज, गुरुवारी सकाळी जेवण करण्यास बसले. परंतु,
अन्नात अळ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. येथे जेवण पुरविणारी स्वामी विवेकानंद सहकारी संस्था निकृष्ठ जेवण
पुरवित असल्याचा आरोप करून संस्थेविरुद्ध होणाèया तक्रारींकडे आदिवासी विकास प्रकल्प जाणून दुर्लक्ष करणयात येत
असल्याचा आरोप विद्याथ्र्यांनी केला. जेवणातील अळ्यांसदर्भात विद्याथ्र्यांनी स्वयंपाकीची विचारपूस केली. परंतु, योग्य
उत्तर मिळाले नसल्याने विद्याथ्र्यांनी जेवणावर बहिष्कार घातला. यासंदर्भात आदिवासी विद्यार्थी संघाच्या नेतृत्वात
आंदोलन करण्यात आले. गृहपालांना भेटून त्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनकत्र्या विद्याथ्र्यांमध्ये गणेश मडावी,
दीपक चनाप, आशीक कल्लो, विकेश सय्याम, संदीप गावराने, एकनाथ बांडे, रामसाय पंधरे, अमीत परसगाये, सुनिल
परसगाये, निशांत मडावी, रामदास बोबडे, प्रशांत राऊत विजय गावराने, सहेसराम राऊत, संदीप नेताम, कैलाश
कोकोडे, हरेश लटये, वरूण उईके, रवी भलावी, आशिक उईके, मुकेश इनवाते, राजकुमार वाईक, सुरेन जमदाळ, शैलेश
कवास, खुमराज गावड, डंकेश्वर घाटघुवर, शैलेश पराते, विवेक नेताम, स्नोहल कोठेवार, चेतन देवरे, संदीप हुर्रे आदींचा
समावेश आहे.

विद्याथ्र्यांच्या मागण्या
निर्वाह भत्ता व गणवेश निधी तातडीने देण्यात यावा. शैक्षणिक साहित्य व पुस्तके पुरविण्यात यावी. क्रीडा साहित्य
पुरविण्यात यावे. संगणक आणि टंकलेखन प्रशिक्षण चालू सत्रात उपलब्ध करून द्यावे. वस्तीगृहातील विद्याथ्र्यांना
सहलीकरिता २५ हजार रुपये उपलब्ध करून द्यावे. टेबल आणि खुच्र्या उपल्बध करून द्याव्या. संगणक आणि इंटरनेट
उपलब्ध करून दयावे. पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात यावे. पाण्याचे नळ, स्नानगृहांची दुरुस्ती, स्वयंपाक गृहाची
स्वच्छता नियमीत करावी. शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार जेवण देण्यात यावे. पंखे आणि लाइटची व्यवस्था
करावी. स्पर्धा परीक्षेसंदर्भात मासीक आणि वर्तमानपत्र उपलब्ध करून द्यावे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन प्रशिक्षणाची सोय
करण्यात यावी.