ब्राम्होस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

0
11

नवी दिल्ली – लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता असलेल्या भारताच्या सुपरसॉनिक ब्राम्होस क्षेपणास्त्राची शनिवारी गोव्याच्या किनारपट्टीवरुन यशस्वी चाचणी घेण्यात आली. २९० किलोमीटर अंतरावरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
१६ ऑगस्ट २०१४मध्ये भारतीय नौदल्यात दाखल करण्यात आलेल्या आयएनएस कोलकाता या युद्ध नौकेवरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ब्राम्होसने चाचणीचे सर्व निकष पूर्ण केले. असे अधिका-यांनी यावेळी सांगितले.
भारत आणि रशियाने संयुक्तरित्या निर्मिती केलेल्या ब्राम्होत्र क्षेपणास्त्राचा लष्कर आणि नौदलाने आधीच आपल्या क्षेपणास्त्र ताफ्यात समावेश केला आहे.