संपूर्ण गावात शौचालयं बांधेपर्यंत अन्नपाणी नाही, आमदाराचा आत्मक्लेश

0
7

बुलडाणा: गावातल्या प्रत्येक घरामध्ये शौचालय बांधून निर्मल ग्राम करण्यासाठी चिखलीच्या आमदारांनी आत्मक्लेश सुरु केला आहे. आमदार राहुल बोंद्रे यांनी गेल्या दोन दिवसांपासून अन्न आणि पाण्याचा त्याग केला आहे.

मतदारसंघातील आदर्श गाव खोर येथे रस्ते, पाणी, वीज सुरळीत आहे, मात्र गावात 100 टक्के शौचालयं नाहीत. अनेकदा विनंती करुन गावकऱ्यांनी कानाडोळा केला. शेवटी आमदारांनीच आत्मक्लेश करुन घेतला.

आमदाराच्या आत्मक्लेशानंतर गावकऱ्यांनी तब्बल 60 शौचालयांचं बांधकाम तातडीनं सुरु केलं आहे. त्याचबरोबर आमदारांच्या आत्मक्लेश आंदोलनाला पंचक्रोशीतल्या नागरीकांचा पाठिंबा मिळत आहे.