मोर्शी – माहूर एसटी बसला अपघात

0
8

यवतमाळ : तांत्रिक बिघाड होवून गिअर अडकल्याने भरधाव एसटी बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या अपघातात २5 प्रवासी जखमी झाले. तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना यवतमाळ-आर्णी मार्गावरील अर्जुना घाटात रविवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास घडली.
शशिकला लक्ष्मण गोल्हर, लक्ष्मण तानबा गोल्हर, जान्हवी र्जनादन गोल्हर, मंदा राजू गायधने, तुकाराम सोमला जाधव सर्व रा. लोणी, अंबादास नारायण पत्ते, गणेश किसन डवले, रमेश किसन डवले सर्व रा. पहापळ, वंदना गजानन खरतडे रा. आष्टी, लता अरूण तिडके, अश्‍विनी दीपक कौसटवार, मोहीत दीपक कौसटवार रा. मांग्लादेवी, माणिक शिवराम खद्रे, प्रमोद माणिक खद्रे रा. शिवणी, ज्योती प्रवीण शिंदे, रूद्रेश प्रवीण शिंदे, नजीमाबि शेख रहमान, रा.आर्णी, प्रभा माणिक बन्सोड रा. माहूर, रविता विजय जाधव, विजय मारोती जाधव रा. भंडारी आणि अशोक विठ्ठल मुनेश्‍वर रा. कृष्णापूर अशी जखमींची नावे आहेत. मोर्शी आगाराची बस (एमएच ४0 – एन ८९६७) घेऊन चालक दिलीप विजयकर रविवारी सकाळी ११.३0 वाजता मोर्शी-माहूर बस घेऊन निघाले. यवतमाळवरून आर्णीकडे जात असताना अर्जुना घाटाम गिअर अडकल्याने बस अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उतरून उलटली. त्यात २१ प्रवासी जखमी झाले. हा अपघात होताच यवतमाळ ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. जखमींना चार रुग्णवाहिकांमधून येथील शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर संतप्त प्रवाशांनी चालक दिलीप विजयकर यांना बेदम मारहाण केली.