भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला प्रतिष्ठेचा ‘करिअर’ पुरस्कार

0
12

वॉशिंग्टन : गुरप्रीतसिंग या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाला रीचार्जेबल बॅटरी तयार करण्यासाठी लागणारा धातूचा अत्यंत पातळ पत्रा (अल्ट्रा थीन मेटल शीट) तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्याबद्दल पाच लाख अमेरिकी डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे. नॅशनल सायन्स फाऊंडेशनतर्फे हा प्रतिष्ठेचा ‘करिअर’ पुरस्कार दिला जातो. गुरप्रीतसिंग हे कान्सस विद्यापीठात मेकॅनिकल आणि न्यूक्लिअर इंजिनीअरिंग विभागात सहायक प्राध्यापक आहेत. पुरस्काराच्या रकमेतून रीचार्जेबल बॅटरी आणि सुपर कॅपॅसिटर्स तयार करण्यास उपयुक्त ठरू शकणा-या पातळ पत्र्याची निर्मिती करणार आहेत. याशिवाय विज्ञानाशी निगडित विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्याचाही सिंग यांचा विचार आहे.