रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाची सुरवात

0
17

रायगड दि.२८ः– मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यात ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे. मात्र  सामाजिक परिवर्तन घडवून प्रगती साधायची असेल तर गावात एकोपा असणे आवश्यक आहे. गाव एक झालं तर काहीही साध्य करता येवू शकते. सामाजिक एकोपा हीच खरी परिवर्तनाची गुरु किल्ली आहे , असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी (28 एप्रिल) माणगांव तालुक्यांतील मुठवली गावांतील ग्रामस्थांमध्ये जागविला आहे. यावेळी ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रह्मण्यम , जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, प्रांताधिकारी ए.आर.देगावकर, तहसिलदार उर्मिला पाटील, गटविकास अधिकारी खेडकर,उपविभागीय कृषि अधिकारी येवले तसेच स्वदेस फाऊंडेशचे तुषार ईनामदार, ग्राम सामाजिक परिवर्तक लहू दोलताडे यांच्यासह ग्रामस्थ महिला, पुरु ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी व मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रह्मण्यम यांनी गावात विविध उद्योग व्यवसाय करणार्या कुटूंबांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी व विचारपूस केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधतांना डॉ. सूर्यवंशी म्हणाले की,  गाव करी ते राव न करी अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणोच गावाने एकत्न येऊन ठरवावे,त्यांना हवा तो विकास ते करु  शकतात. त्यासाठी शासनाची यंत्रणा नेहमी त्यांना सहयोग करेल. गावच्या शाळेचा विकास करा. त्यासाठी ग्रामस्थांनी योगदान द्या. हे योगदान आपल्या मुलांच्या विकासासाठी आज केलेली मोठी गुंतवणूक ठरेल. गावकऱ्यांनी मिळून गावात नियमत स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन केले.