डॉ.ललीत कटरेंचा मृत्यू,कुटूबियांनी केले नेत्रदान

0
8

गोंदिया,दि.२६ः-येथील सिव्हील लाईन्स निवासी असलेले (मूळचे रामाटोला,ता.गोरेगाव) येथील डॉ.ललित कटरे(वय ४६) यांचे आज शनिवारला उपचारादरम्यान मृत्यू झाले.डॉ.कटरे यांनी आधीच आपला जेव्हा केव्हा मृत्यू होईल तेव्हा अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार त्यांच्या पत्नी डॉ.तृप्ती कटरे यांनी नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला.डॉ.ललीत यांच्या नेत्रदानामुळे एक नवी पहाट बघण्याची संधी दोघांना मिळणार आहे.ही प्रकिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाच्या नेत्ररोग विभागाच्या चमूने पार पाडली.त्यानंतर त्यांच्यावर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर असे की मृतभाषी व मनमिळावू स्वभावाचे असलेले डॉ.ललित कटरे हे शासकीय जिल्हा रुग्णालयात वैद्यकीक अधिकारी म्हणून काही काळ कार्यरत होते.त्यानंतर त्यांनी राजीनामा देत खासगी क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांची सेवा सुरु केली होती.त्यातच नेहमीप्रमाणे ते १८ मे रोजी सायकांळला फूलचूर येथील प्रकाश जायस्वाल यांच्या मालकीच्या असलेल्या रामदेव कॉलनीतील स्विमींग पुलात पोहण्यासाठी रात्रीला गेले होते.रात्रीला जेव्हा स्विqमगमध्ये पोहण्यासाठी आले तेव्हा आतमध्ये जी लाईटव्यवस्था सुरु असायला हवी होती ती बंद होती.तरीही तेथील व्यवस्थापकाने त्याकडे दुर्लक्ष करीत पोहण्यासाठी आलेल्या डॉ.ललीत यांना पोहण्याची परवानगी दिली.मात्र त्याठिकाणी हजर असलेल्या प्रशिक्षकासह सुरक्षारक्षकाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत मोबाईलवर खेळण्यातच ते गुंग राहिले.यातच डॉ.ललीत यांचे खोलभागात संतुलन बिघडले आणि पोहतानाच त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागल्याने त्यांनी दीड तो दोन मिनिटे आपल्या बचावासाठी प्रयत्न केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसून येते.
डॉ.ललीत हे बचावासाठी प्रयत्न करीत असतानाही त्याठिकाणी असलेला सुरक्षा रक्षक हा मात्र मोबाईलवरच खेळत असल्याचे दिसून आले आहे.या सुरक्षारक्षक व व्यवस्थापकाच्या हलगर्जीपणामुळे डॉ.ललीत पाण्यात बुडाले.ते दिसत नसल्याने सोबत आलेल्या त्यांच्या पत्नी डॉŸ.तृप्ती यांनी शोधाशोध केली त्यानंतर कुठेच न दिसल्याने स्विqमगपुलात शोध घेण्यात आले असता ते बुडालेले होते.त्यांना बाहेर काढून त्यांच्या शरिरात गेलेले पाणी बाहेर काढून लगेच स्थानिक केएमजे रुग्णालयात दाखल करुन त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.परंतु त्यांच्या मेंदूत पाणी गेल्यामुळे त्यांना नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.तिथे उपचार केल्यानंतर त्यांना दोनदिवसापुर्वीच गोंदियाच्या गोंदिया हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते.परंतु आज त्यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाले.त्यांच्या मृत्यूमुळे वैद्यकिय क्षेत्रातच नव्हे तर त्यांचे जन्मगाव रामाटोला व गोंदियातही हळहळ व्यक्त केली जात आहे.याप्रकरणाच डॉ.ललीत यांच्या पत्नी तृप्ती कटरे यांनी गोंदिया ग्रामीण पोलीसात स्विमिगपुल व्यवस्थापनाविरुध्द तक्रार दाखल केली आहे.मात्र त्या तक्रारीवर अद्यापही पोलीसांनी कुठलीच कारवाई केलेली नाही.यापुर्वीसुध्दा याच स्विqमगपुलात संजयनगर निवासी एका बालकाचा मृतदेह आढळला होता.प्रशासन या स्विqमगपुलाच्या व्यवस्थापनासह सुरक्षारक्षकवर कारवाई करणार की राजकीय दडपणात हे प्रकरण दाबणार याकडे लक्ष लागले आहे.