बीएसएनएलचे थ्रीजी दर 50 टक्‍क्‍यांनी कमी होणार

0
7

नवी दिल्ली : खाजगी क्षेत्रातील मोबाईल कंपन्यांचे दर दिवसेंदिवस वाढत असताना भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) लवकरच आपल्या थ्रीजी सेवेच्या दरात 50 टक्‍क्‍यांची कपात करणार आहे. नेटवर्क विस्ताराचा पुढील टप्पा पूर्ण झाल्यानंतर बीएसएनएलच्या थ्रीजी इंटरनेटचे सेवेचे दर कमी होण्याची शक्‍यता बीएसएनएलचे वर्तविली आहे.

“कंपनीच्या आठव्या टप्प्याच्या नेटवर्क विस्तारानंतर थ्रीजी सेवेच्या दरांमध्ये कपात होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या दरांच्या तुलनेत 50 टक्के कपात केली जाऊ शकते.” असे बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले आहे. तसेच सुमारे 90 टक्के थ्रीजी क्षमतेचा वापर केला असून दरांमध्ये तात्काळ कपात केली तर ग्राहकांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचेही ते म्हणाले. कंपनी सध्या सातव्या टप्प्याच्या नेटवर्क विस्तारावर काम करत आहे. यासाठी कंपनी 4,800 कोटी रुपये खर्च करणार आहे. हा विस्तार यंदाच्या जूनपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असेही ते म्हणाले.