शेतकर्‍याच्या घरी मुख्यमंत्री मुक्कामी

0
18

यवतमाळ – मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हटले की मोठा डामडौल असतो. मात्र, मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यात देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍यात कुठेही बडेजाव दिसला नाही. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या यवतमाळमधील रातचांदना, घोडा खिंडी पिंप्री बुर्ज या तीन गावांना मुख्यमंत्र्यांनी भेटी देऊन तेथील शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेतल्या. इतकेच नव्हे, तर पिंप्री बुर्ज येथील शेतकरी विष्णू ढुमणे यांच्या घरी त्यांनी मुक्कामही केला. ‘जेवणासाठी स्पेशल मेनू नको’ असे हक्काने सांगत फडणवीसांनी ठेचा, भरीत भाकरी या गावरान मेनूचाच आस्वाद घेतला. त्यांच्या या साधेपणाने गावकरी मात्र हरखून गेले हाेते.

ग्रामस्थांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘सत्तेवर येऊन अवघे तीन महिने झालेत. आम्हाला वेळ द्या. आम्ही शेतकर्‍यांच्या जीवनात नक्कीच समृद्धी आणू. विदर्भात सिंचनाची मोठी समस्या आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना आम्ही सुरू केली आहे. विदर्भातील दोन हजार गावांत या योजनेेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. दुष्काळसदृश परिस्थिती दूर करणार आहोत. शेतकरी बांधवांनो, निराश होऊ नका. एकमेकांत विश्वासाचे नाते निर्माण करा. हे चित्र नक्कीच पालटेल,’ असा दिलासा दिला.(साभार दि्व्य मराठी)