खासदारांच्या होळीवर भडकले सभापती

0
9

नवी दिल्ली -बुधवारी संसदेच्या प्रवेश द्वार क्रमांक एक येथे रंगारंग वातावरण होते. आज (गुरुवार) होळीची सुटी असल्याने खासदारांनी बुधवारीच होळी खेळण्याची तयारी केली होती. तेव्हा लोकसभेत विमा विधेयक मंजूर झाले. संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ भाजप खासदार जगदंबिका पाल, साक्षी महाराज उपस्थित होते. त्यांनी खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी, किरण खेर यांच्यासह अनेक खासदारांवर रंग टाकला आणि होळीच्या शुभेच्छा दिल्या. ते सशाच अवस्थेत सभागृहात गेले. सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर उपसभागती थंबी दुराई यांच्या त्यांच्याकडे लक्ष गेले आणि ते म्हणाले, की हे बरोबर नाही. ते ऐकताच साक्षी महाराज बाहेर निघून गेले पण पाल तसेच बसून राहिले. तेव्हा भाजपचेच खासदार ब्रिजभूषण त्यांच्याजवळ गेले आणि त्यांनी त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली. त्यावर ते स्पष्टीकरण देऊ लागले. मात्र ब्रिजभूषण यांनी त्यांना शांतपणे समजावले, की होळीच्या रंगाचा भंग व्हायला नको. त्यानंतर जगदंबिका पाल बाहेर गेले.