बांगलादेशचा स्कॉटलंडवर ऐतिहासिक विजय

0
8

वृत्तसंस्था
नेल्सन- स्कॉटलंडने विजयासाठी ठेवलेले 319 धावांचे आव्हान पार करत बांगलादेशने आज (गुरुवार) ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

बांगलादेशकडून तमीम इक्‍बाल 95, महमुदुल्लाह 62, मुश्‍फिकुर रहीम 60, व साकिब अल हसनने 52 धावा केल्या. बांगलादेशने 48.1 षटकामध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला. बांगलादेशने 300 पेक्षा जास्त धावांचा प्रथमच पाठलाग करत विजय मिळविला आहे. स्कॉटलंडचा सलामीवीर काएले कोएत्झर (156 धावा) याला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले.

दरम्यान, विश्वकरंडक 2015 मध्ये असलेल्या ए ग्रुपमधील हे संघ आहेत. स्कॉटलंडचा सलामीवीर काएले कोएत्झर (156 धावा) याने दीडशतकी खेळी केली. स्कॉटलंडने आठ गड्यांच्या मोबदल्यात 318 धावा केल्या होत्या. बांगलादेशचा गोलंदाज तस्किन अहमद याने 43 धावा देत तीन गडी बाद केले.

बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. स्कॉटलंडची खराब सुरवात झाली. केवळ 38 धावांवर दोन गडी बाद झाले होते. परंतु, कोएत्झरने दम बसल्यानंतर जोरदार फटकेबाजी केली होती.