देशभरात धुळवडीचा उत्साह

0
20

नवी दिल्ली – आज विविध रंगांची देशभरात उधळण होत असून जिकडे-तिकडे ‘रंग बरसे’च्या उत्सवात सारेच दंग झालेत. होळी दहनानंतर आज देशभरात धुळवड साजरी होत आहे. या रंगोत्सवाची दखल गुगलनेही घेतली आहे. त्यामुळे गुगलच्या होम पेजवर आज धुळवडीनिमित्त डुडल रंगले आहे. जगातील महत्त्वाच्या घटनांची नोंद गुगलवर घेतली जाते. गुगलने आज होळीनिमित्त डुडल बनवून भारतवासियांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. विविध रंगांनी रंगल्यानंतर जे स्मितहास्य अनेकांच्या चेहऱ्यावर उमटते. त्याचप्रकारे गुगल हे नाव विविध रंगांनी रंगल्यानंतर हास्यरंग उमटले आहे. होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. देशात आज रंगोत्सव साजरा केला जातो. यंदा या महोत्सवावर स्वाईन फ्लूचे सावट असले, तरी सावधपणे जो तो रंग खेळण्याचा प्रयत्नात आहे. या रंगोत्सवासाठी बाजारात विविध रंग उपलब्ध करण्यात आले. याशिवाय मोदीनामाच्या पिचकारीही मोठ्या प्रमाणात बाजारात दिसून आल्या. एकूण या उत्सवाने सर्वांवरील निराशारुपी रंगाला दूर सारल्याचे चित्र आहे.