घुमान संमेलनाला पंजाबचा राजाश्रय

0
5

पुणे : घुमान येथे होत असलेले ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंजाब सरकाराचा राजश्रय मिळाला आहे. हे संमेलन पंजाब राज्य सरकारचे असेल असे आश्वासन पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी दिले असल्याचे संमेलनाचे संयोजक भारत देसडला यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

घुमान येथे ३ ते ५ एप्रिल या कालावधीत घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या नियोजनासंदर्भात देसडला, संजय नहार यांनी घुमानभेटी दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांच्याशी चर्चा केली. त्या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. घुमानच्या विकासासाठी घुमान डेव्हलपमेंट बोर्ड स्थापन करण्यात येणार असून त्यातील एक टप्पा म्हणून घुमान येथील मुलांच्या शैक्षणिक विकासाकरीता महाविद्यालयास भाषाभवन, यात्री निवास पंजाब सरकार उभारणात आहे. प्रस्तावित महाविद्यालयास संत नामदेवबाबाजी असे नामकरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

देसडला म्हणाले, ‘‘एखाद्या राज्याने आपल्या राज्याचा कार्यक्रम म्हणून साहित्य संमेलन घेणे ही संमेलनाच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी पंजाब सरकाराने समन्वयक म्हणून अतिरिक्त मुख्य सचिव सुरेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.’’

पहिला टप्पा म्हणून संमेलनाच्या पहिल्या दिवशी, ३ एप्रिल रोजी कॉलेजच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.