रविवारला पहिले पोवारी भाषा साहित्यसमेंलन तिरोड्यात

0
16
गोंदिया,दि.२- राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या तत्वाधानात आयोजित पहिल्या अखिल भारतीय पोवारी भाषा साहित्य समेलनाचे आयोजन ३ फेबुवारीला तिरोडा येथील गुमाधावडा येथे करण्यात आले आहे.
या समेलनाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य श्रीमती डॉ.मंजु अवस्थी राहणार आहेत.उदघाटन तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.स्वागताध्यक्ष म्हणून शिक्षण महर्षी राधेलाल पटले राहणार आहेत.या समेलनात जेष्ठ पवारी साहित्यिक जयपालqसह पटले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ साहित्यकार वल्लभ डोंगरे,राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष      मुरलीधर टेंभरे,भोयर पवार महासभेचे अध्यक्ष डॉ.नामदेव राऊत,शिक्षण महर्षी जगतराम रहागंडाले,दिलीप कालभोर,हेमेंद्र क्षिरसागर,सरपंच ओमप्रकाश पटले,चेतन भैरम,योगेंद्र भगत,राजलक्ष्मी तुरकर,पंचम बिसेन,मोतीलाल चौधरी,सी.डी.पटले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ८ वाजता पुस्तक qदडी काढून अखिल भारतीय पहिल्या पोवारी साहित्य समेंलनाची सुरवात करण्यात येणार आहे.त्यानंतर सकाळी ९ वाजता समेलनाचे उदघाटन करण्यात येणार आहे.
सकाळी ११.३० वाजता कला प्रदर्शनीचे उदघाटन झाल्यानंतर दुपारी १२ वाजता पवारी भाषा,कला,संस्कृती व संवर्धन या विषयावर आयोजित परिसवांदाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य लखनqसह कटरे राहणार आहेत.चर्चेत डॉ.तीर्थानंद बन्नगरे,गुलाब बिसेन सहभागी होणार असून रqवद्र टेंभरे हे संचालन करणार आहेत.दुपारी २ वाजता पोवारी भाषेतील कवि समेलन आयोजित करण्यात आले असून या कवि समेलंनाच्या अध्यक्षा अलका चौधरी राहणार असूून समेलनाचे संचालन डॉ.शेखराम येडेकर करणार असून समन्वय युवराज qहगवे व रणदीप बिसेन हे करणार आहेत.सायकांळी ४ वाजता लोककला मंचन सत्राच्या अध्यक्षस्थानी विद्या बिसेन राहणार आहेत.
तर रात्री ८.३० वाजता समेलंनाचा समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर टेंभरे हे राहणार आहेत.समारोपाचे संचालन देवेंद्र बिसेन करणार आहेत.यावेळी पुरस्कार वितरणासह पुढील सम्मेलनस्थळाची घोषणा करण्यात येणार आहे.या साहित्य समेलनाला पवार,पोवार समाजातील सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय पवारी साहित्य कला संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टेंभरे,कार्याध्यक्ष लखनqसह कटरे,सचिव देवेंद्र चौधरी ,डॉ.शेखराम येडेकर,बाबा भैरम,शशिकला ठाकरे,स्वागताध्यक्ष राधेलाल पटले,प्राचार्य दुर्गाप्रसाद पटले आदींनी केले आहे.