चंदेरी दुनियेत मिनी मुंबई गोंदियाचा डंका

0
29

गोंदिया : चित्रपट सृष्टीच्या चंदेरी दुनियेत पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर आहे. विदर्भ मात्र, चित्रपट निर्मितीच्या बाबतीत व कलावंतांच्या बाबतीत पुर्वीपासूनच उपेक्षीत राहीला आहे. झाडीपट्टी ही कलावंत निर्माण करणारी पॅâक्ट्री असली तरी चित्रपट सृष्टीत प्रस्तापितांचे राज असल्याने विदर्भवासीयांना संधी मिळत नव्हती. मात्र, लालचुडा या मराठी चित्रपटानंतर साई बाबा फिल्म प्रोडक्शन वंâपनी गोंदियात हिंदी चित्रपट साकारणार असून आता चंदेरी दुनियेत विदर्भाची मिनी मुंबई गोंदियाचा डंका वाजणार आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील शेखर पटले निर्मित मराठी चित्रपट लालचुडा का मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आला. झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे विदर्भाच्या शेवटच्या जिल्ह्याची रंगभूमी आणि या रंगभूमीच्या मातीत हजारो दिग्गज कलावंत निपजले. परंतु ही रंगभूमी केवळ पुर्व विदर्भापूरतीच मर्यादीत राहू नये, ही रंगभूमी महाराष्ट्राच्या कानाकोपNयात पोहचावी म्हणूनच साई बाबा फिल्म प्रोडक्शनने लालचुडा निर्मिती केली होती. व हा चित्रपट यशस्वीरित्या प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटामुळे झाडीपट्टीतील बNयाच कलावंतांना महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याची स्वर्ण संधी प्राप्त झाली. लालचुडानंतर आता साई बाबा फिल्म प्रोडक्शन गोंदियाची गरुड झेप म्हणजेच पुन्हा एका नवीन हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून झाडीपट्टीचा कलावंत फक्त महाराष्ट्रच नव्हे तर अख्या भारत देशातील रसिकांच्या मनात घर करणार आहे. या चित्रपटाची शुटिंगसुद्धा पुर्णत: गोंदिया जिल्ह्यातच मे व जून दरम्यान होणार आहे. गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा या जिल्ह्यातून तथा संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योन्मुख कलावंतांना ऑडीशनच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. गोंदिया जिल्ह्यात निर्माण होणारा हा पहिला-वहीला चित्रपट राहणार असून या चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या राजधानीत (मुंबई) विदर्भाच्या मिनी मुंबईचा (गोंदिया) डंका वाजणार आहे.