जलसंपदामंत्र्याने मुकबधीर विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात बाळगली पिस्तुल

0
11

जळगाव : राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कंबरेला पिस्तुल खोचून मूकबधीर विद्यार्थ्यांसमोर भाषण ठोकल्याचा प्रकार जळगाव य़ेथे घडला आहे.हा प्रकार जळगावमध्ये मूकबधीर मुलांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रमात घडला.दरम्यान याप्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी महाजन यांना स्वतच्याच सरकारमध्ये असुरक्षित वाटत असेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
मूकबधीर मुलांसाठी साहित्य वाटपाच्या या कार्यक्रमासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सुपेकर व्यासपीठावर होते. मात्र या कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी चक्क कंबरेला पिस्तुल लावून भाषण ठोकले.आमदाराला किंवा मंत्र्याला असते तशी सुरक्षा महाजन याना देखील आहे. मात्र तरी देखील त्यांनी अशा पद्धतीने पिस्तुल बाळगणे कितपत योग्य आहे, पोलिस बंदोबस्त असताना महाजन यांना असुरक्षित का वाटावे, असे प्रश्न देखील आता निर्माण झाले आहेत.

विशेष म्हणजे आपण मूकबधीर विद्यार्थ्यांसमोर बोलत आहोत. याचं साधं भानही जलसंपदामंत्र्यांना राहिलं नाही. त्यामुळे महाजन यांच्या या वागण्यावर संताप व्यक्त केला जातो आहे. महाजन यांच्याकडे परवाना असलेलं पिस्तुल आहे. मात्र जाहीर कार्यक्रमात तेही मुकबधीर विद्यार्थ्यांसमोर अशा ओंगळवण्या प्रदर्शन करण्याची गरज काय, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.दरम्यान जलसंपदा मंत्री महाजन यांनी आपण आपल्या सुरक्षेसाठी पिस्तुल बापरत असल्याचे म्हटले आहे.(छायाचित्र-साभार एबीपीमाझा)