शिवसेनेकडून शोभा डे यांना मिसळ आणि वडापाव!

0
18

मुबंई-मराठी चित्रपटांना ‘प्राईम टाईम’ दिल्याने ट्विटरवरून टीका करणार्‍या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत आज (गुरूवारी) शिवसैनिकांनी डे यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली.तसेच त्यांना मिसळ आणि वडापाव भेट स्वरुपात पाठविले.
मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखविण्यात येणार असल्याने शोभा डे यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसंच, मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडत आता मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्नऐवजी दहीमिसळ आणि वडापाव खावा लागणार असल्याचे म्हटलं होते. त्यावर शिवसेनेने डे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला. तसंच, सामनाच्या अग्रलेखातूनही खरपूस समाचार घेत डेंच्या तोंडात वडापाव कोंबण्याचं आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर दहीमिसळ, वडापाव घेऊन दाखल झाले आणि जारेदार निदर्शने केली.