रात्री नऊ ते सकाळी सात मोफत कॉल करा

0
14

मुंबई – मोबाईलच्या युगामध्ये लँडलाईन फोनचा वापर सध्या कमी झाला आहे. कार्यालयीन वापर सोडता घरगुती लँडलाईनचे ग्राहक कमी होत चालले आहेत.
लँडलाईन ग्राहकांची घटती संख्या लक्षात घेता बीएसएनएलने ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. एक मे पासून देशातील कोणत्याही राज्यात रात्री नऊ ते सकाळी सात वाजेपर्यंत बीएसएनल लँडलाईन ग्राहकांना फुकटात कॉल करता येणार आहे.
सध्या बीएसएनएलच्या सेवेचा फायदा केवळ ब्रॉड बँड कनेक्शनसाठी केला जात आहे. मात्र ज्यांना इंटरनेट सेवेची गरज नाही त्यांनी कनेक्शन बंद करण्यास सुरुवात केली होती. ही घटती ग्राहकसंख्या लक्षात घेता ग्राहकांना पुन्हा एकदा आकर्षित करुन घेण्यासाठी ही नवीन सेवा सुरु करण्यात येणार आहे.
बीएसएनएलच्या या नव्या सेवेमुळे ग्राहकांना रात्रीचे दहा तास मोफत कॉलची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्राहक पुन्हा लँडलाईनचा वापर सुरु करतील असा कंपनीने यावेळी विश्वास व्यक्त केला