केळीची पाने असतात अत्यंत शुभ, केळीशी संबंधित खास गोष्टी

0
177

केळीच्या झाडाला प्राचीन काळापासून पूज्य आणि पवित्र मानले गेले आहे. सनातन धर्मामध्ये केळीचे झाड पूजनीय मानण्यात आले आहे. केळीचे फळं, पानं पूजेमध्ये उपयोगात आणले जातात. हे शुभ आणि पवित्रतेचे प्रतिक आहे. केळीच्या झाडामध्ये देवगुरु बृहस्पतीचा वास मनाला गेला आहे. शास्त्रानुसार सात गुरुवार नियमितपणे केळीची पूजा केल्यास साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मुलींना उत्तम वर प्राप्त होतो.

केळीचे झाड आणि पानांचे महत्त्व –
प्रत्येक पूजन कर्मामध्ये केळीच्या पानांचा उपाय केला जातो. ऋषीपंचमीच्या दिवशी केळीच्या पानावर चंदनाने सप्तऋषीचे चिन्ह काढून पूजा केली जाते. श्रीसत्यनारायण कथेमध्ये केळीच्या पानांचा मंडप केला जातो. दक्षिण भारतामध्ये केळीच्या पानावर जेवण केले जाते.

पलाशपद्मनीचूतकदलीहेमराजते।
मधुपत्रेषु भोक्तव्यं ग्रासमेकं तु गोफलम्॥

अर्थ – पलाश, पद्मिनी (कमळ), आंबा आणि केळीच्या पानांपासून तयार केलेली पत्राळ, सोने आणि चांदीच्या ताटात केलेले जेवण लाभप्रद राहते.
असे करावे पूजन –
– सकाळी मौन धारण करून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर केळीच्या झाडाला नमस्कार करून जल अर्पण करावे.
– हळकुंड, हरभऱ्याची डाळ आणि गुळ अर्पण करून नमस्कार करावा.
– कुंकू, अक्षता, फुल अर्पण करून प्रदक्षिणा घालावी.
– अशाप्रकारे केळीच्या झाडाची पूजा केल्यास देवगुरु बृहस्पती प्रसन्न होऊन साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.