बाल संगोपनासाठी दोन वर्षाची रजा मिळावी

0
15

भंडारा दि.3:- केंद्र शासनाप्रमाणे दोन वर्षाची बालसंगोपन रजा मिळावी यासाठी महिला अधिकारी व कर्मचारी यांनी आज जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.
शासन सेवेतील महिला कर्मचारी व अधिकार्‍यांना महत्वाच्या जबाबदार्‍या पार पाडत असताना मुलांच्या मानसिक, भावनिक व शारीरिक आरोग्य सांभाळणे यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी महिलांना मोठय़ा प्रमाणात मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील महिलांना त्यांच्या मुलांप्रती तसेच चांगला समाज घडविण्यासाठी असलेले त्यांचे कर्तव्य निभावता येऊ शकते. महाराष्ट्रात महिला प्रशासन सेवेतील महत्वाचे पद सांभाळत आहेत. महाराष्ट्राच्या विकासात महिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर कुटुंबाची जबाबदारी त्या नेटाने उचलत आहेत. महिला कितीही उच्च पदावर कार्यरत असल्या तरीही त्यांना मुलांच्या संगोपनाची जबाबदारी उचलावी लागतेच. मुलांच्या संगोपनाची जबाबदारी व्यवस्थीतपणे पार पाडता यावी म्हणून महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाप्रमाणे २ वर्षाची बालसंगोपनरजा लागू करावी, यासाठी हे निवेदन देण्यात आले.