भारतातील 10 उद्योगपंतीचे शिक्षण

0
12

मुंबई : जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थान पटकावणारे टाटा-अंबानी-बिर्ला यांच्यासारखे भारतीय उद्योगपती त्यांची मेहनतीमुळे आपल्याला माहित आहेत.मात्र त्यांचं नक्की शिक्षण किती झालं आहे, हे साधारणात: आपल्याला माहित नसते. भारतातील अनेक उद्योगपतींनी तर डिग्री नसतानाच व्यवसायात पाऊल ठेवले. तर पाहूया किती शिकलेत आपले भारतीय उद्योगपती.
रतन टाटा : टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी 1962 मध्ये अमेरिकेच्या कॉरनेल विद्यापीठातून ‘आर्किटेक्चर एंड स्ट्रक्चरल इंजीनियरिंग’मध्ये पदवी घेतली आहे. यानंतर 1975 मध्ये त्यांनी हॉर्वर्ड बिझनेस स्कूलमधून अडव्हान्स मॅनेजमेंटची डिग्रीही घेतली.

मुकेश अंबानी : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळख असणारे मुकेश अंबानी यांनी मुंबई विद्यापीठाच्या केमिकल डिपार्टमेंटमधून (UDCT) केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर मुकेश अंबानी एमबीए करण्यासाठी स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये गेले. मात्र ते तिथे शिक्षण पूर्ण करु शकले नाहीत. भारतात येऊन वडील धीरुभाई अंबानींसोबत व्यवसायात सहभाग घेण्यास सुरुवात केली.
दीपक पारेख : दीपक पारेख सध्या एचडीएफसी बँकेचे अध्यक्ष आहेत. दीपक पारेख हे चार्टर्ड अकाऊंटंट आहेत. न्यूयॉर्कच्या अनर्स्ट अँड यंग मॅनेजमेंट कंसल्टन्सी सर्व्हिसेससोबत त्यांनी आपलं करिअर सुरु केलं. त्यानंतर ते भारतात आले आमि ग्रिंडलेज बँक आणि चेज मॅनहॅट्टन बँकसोबत काम सुरु केलं. 1978 मध्ये दीपक पारेख यांनी एचडीएफसीसोबत काम करण्यास सुरुवात केली.

कुमार मंगलम बिर्ला : कुमार मंगलम हे आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून बीकॉम पूर्ण केलं आणि चार्टर्ड अकाऊंटंट बनले. त्यानंतर बिझनेस स्कूल ऑफ लंडनमधून एमबीएची पदवी घेतली.

आनंद महिंद्रा : आनंद महिंद्रा हे महिंदा अँड महिंद्राचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ते हॉर्वर्ड कॉलेज, कॅम्ब्रिजमधून ग्रॅज्युएट झाले. तिथूनच त्यांनी फिल्म मेकिंगचा कोर्स पूर्ण केला. यानंतर बिझनेस स्कूल, बोस्टनमधून 1981 साली एमबीएची डिग्री घेतली.

सुनील भारती मित्तल :
टेलिकॉम टायकूनच्या नावाने लोकप्रिय असलेले सुनील भारती मित्तल हे मित्तल इंटरप्रायझेसचे अध्यक्ष आणि ग्रुप सीईओ आहेत. त्यांनी पंजाब मित्तल यूनिव्हर्सिटीमधून 1976 साली ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर बॅचलर ऑफ आर्ट्स अँड सायन्सची डिग्री घेतली. वयाच्या 18 व्या वर्षीच त्यांनी कामाला सुरुवात केली. हॉर्वर्ड बिझनेस स्कूल आणि यूएसएमध्येही शिक्षण घेतले आहे.

एन. आर. नारायण मूर्ती : इन्फोसीसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी 1967 साली यूनिव्हर्सिटी ऑफ म्हैसूरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री घेतली. त्यानंतर आयआयटी कानपूरमधून 1969 साली मास्टर डिग्री घेतली.

अझीम प्रेमजी : विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी, यूएसएमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली. त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला गेला. मात्र झीम प्रेमजी 21 वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्यामुळे ते शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतले.

शिव नादर : शिव नदार हे एचसीएलचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. त्यांनी अमेरिकन कॉलेज, मदुरैमधून प्रि-यूनिव्हर्सिटी डिग्री घेतली. यानंतर पीएसजी कॉलेज ऑफ टेक्नोलॉजीमधून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली.

राजीव बजाज : बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी 1988 साली सावित्रीबाई पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. 1990 साली त्यांनी यूनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकमधून मॅन्युफॅक्चरिंग सिस्टिम इंजिनिअरिंगची पदवी घेतली.