शिवराज्याभिषेक सोहळा राजगडावर जल्लोषात साजरा

0
16

महाड (जिल्हा रायगड)दि.६- छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी जय शिवाजी… जय जय जय जय जय शिवाजी… या आसमंताला छेदणाऱ्या घोषणांच्या निनादात भव्य शिवराज्यभिषेक सोहळा आज (6 जून) तारखेनुसार राजगडावर साजरा करण्यात आला. यावेळी लाखो शिवभक्त हातात भगवे घेऊन उपस्थित होते. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरातील शिवभक्त रायगडावर दाखल झाले आहेत.
पहाटे 5.30 वाजता ध्वजारोहणाने सोहळ्याला सुरवात झाली. त्यानंतर मुख्य राज्यभिषेक सोहळा झाला. युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीवर सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर जगदिश्वर मंदिराकडे भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. शिवधनुष्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शिवनेरीहून पालखी आणली होती.