पुरंदरेंनाच ‘महाराष्ट्र भूषण’, कोर्टाचे शिक्कामोर्तब

0
11

मुंबई दि.१९: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड समितीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची निवड योग्य विचार करुन आणि कायदेशीर प्रक्रिया अवलंबून केल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने पुरस्कारविरोधी याचिका सफशेल फेटाळून लावली. केवळ ‘पब्लिसिटी स्टंट’साठी याचिका दाखल करुन न्यायालयाचा वेळ वाया घालवल्याबद्दल याचिकाकर्त्यांना १० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. आज संध्याकाळी राज भवनात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा होणार आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य काही संघटनांचा विरोध आहे. पुरंदरेंना हा पुरस्कार देण्यात येवू नये यासाठी पद्माकर कांबळे आणि राहुल पोकळे यांनी वकील शेखर जगताप यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हा पुरस्कार देताना निवड समितीने योग्य विचार केला नव्हता असा आक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला. यासाठी त्यांनी २२ एप्रिल २०१५ रोजी झालेल्या समितीच्या बैठकीतील मुद्दे खंडपीठासमोर मांडले. समितीच्या बैठकीत ज्या ९ नावांची चर्चा झाली, त्यात पुरंदरेंची निवड करताना त्यांच्या कार्याची मिमांसा करण्यात आली नाही. केवळ वयाच्या आधारेच त्यांची निवड करण्यात आल्याचा आक्षेप जगताप यांनी नोंदवला. तसेच एक सप्टेंबर २०१२ च्या ‘जीआर’मध्ये पुरस्कारासाठी व्यक्तीची निवड करताना संबंधित व्यक्तीने “२० वर्ष सातत्याने विशेष आणि उल्लेखनीय कार्य केले पाहिजे” असा उल्लेख असल्याचे सांगितले. या निकर्षामध्ये पुरंदरे पात्र ठरतात का? याविषयी निवड समितीने चर्चा केली नाही आणि केवळ वयाच्या आधारे पुरस्कार दिला गेला, राज्य सरकारतर्फे प्रभारी अॅडव्होकेट जनरल अनिल सिंग, बाबासाहेब पुरंदरे यांच्यावतीने वकील उद्य वारुंजीकर, हस्तक्षेप अर्ज करणारे डोंबिवलीतील दोघा अर्जदारांसाठी वकील गणेश सोवनी यांनी युक्तीवाद केला.