साकोलीत कृषी विद्यापीठ स्थापणार-आमदार काशीवार

0
19

साकोली दि.१९: पंजाबराव कृषी विद्यापीठाचे विभाजन करून कृषी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व सिंदेवाही तसेच भंडारा जिल्ह्यातील साकोली ही नावे विचारात घेऊन शासनाने कृषी विद्यापीठ स्थापनेची प्रक्रिया सुरु केली होती. पक्षीय राजकारणामुळे या बाबीकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, साकोली येथे कृषी विद्यापीठ स्थापण्याच्या प्रक्रियेला वेग आल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी चर्चा केली असून साकोली येथे कृषी विद्यापीठ किंवा शासकीय कृषी महाविद्यालय स्थापनेसंदर्भात मागणी केली. त्यामुळे दोन पैकी एक मागणी पूर्णकरण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार काशीवार यांनी दिली.
साकोली, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्याचे केंद्रबिंदू असून साकोली हे राष्ट्रीय महामार्गावर आहे. साकोलीला लागूनच असलेल्या पंजाबराव कृषी विद्यापीठ कुंभली येथे धान संशोधन केंद्र असून येथे विद्यापीठाची ९0 एकर जागा आहे. कृषी विद्यापीठासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यात प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जातात. तसेच भातपिकानंतरच भाजीपाला, कडधान्य, ऊस यासारखेचही मिश्र पिके या जिल्ह्यातून घेतली जातात. त्यामुळे परिसरातील लोकांना याचा फायदा मिळावा यासाठी साकोली येथे कृषी विद्यापीठाची स्थापना योग्य राहणार आहे. साकोलीपासून १00 कि.मी. अंतरावर नागपूर येथे शासकीय कृषी महाविद्यालय आहे. तर दुसरे खासगी महाविद्यालय लाखनी तालुक्यात आहे. त्याच आधारावर साकोली येथे शासकीय कृषी महाविद्यालय झाल्याचा याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकेल.असेही मुख्यमंत्र्यांना पटवून दिले. तसेच चंद्रपूर जिल्ह्यापेक्षा भंडारा जिल्ह्यात सिंचनाची साधने जास्त असून धानाचे उत्पादन इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यात अधिक असल्यामुळे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालयाची निर्मिती होणार अशी माहिती काशिवार यांनी दिली.