‘पर्यावरण दिन विशेष’ पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

0
16

मुंबई दि.१७-: ‘एक पाऊल पर्यावरणासाठी, आपल्याच जीवनासाठी’ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या संकल्पनेतून वनविभागाच्या वतीने तयार केलेल्या ‘पर्यावरण दिन विशेष’ पुस्तकाचे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या समारंभाला महसूलमंत्री एकनाथराव खडसे, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणी पुरवठामंत्री बबनराव लोणीकर, ग्राम विकासमंत्री पंकजा मुंडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, वनविभागाचे सचिव विकास खारगे उपस्थित होते.
पर्यावरण संवर्धनासाठी जगभर साजरे केल्या जाणार्‍या विविध विशेष दिनांची माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. शासनाने नुकतेच पर्यावरणाचे राजदूत जाहीर केले आहेत. त्यामध्ये राज्यप्राणी शेकरू, राज्यपक्षी हरोळी, राज्यफळ आंबा, राज्यफूल जारूळ आणि राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉरमॉन यांच्याविषयीच्या माहितीचा समावेश असून या पुस्तकात पर्यावरण राजदूतांबाबत माहिती देण्यात आली आहे.