तिरोडा तालुका वगळता जिल्ह्यात अतिवृष्टी

0
17

जिल्ह्यात सरासरी १००५.३ मि.मी. पाऊस
ङ्घ देवरी मंडळात सर्वाधिक १६५ मि.मी.पाऊस

गोंदिया, दि.१७ : जिल्ह्यात १ जून ते १७ सप्टेंबर २०१५ या कालावधीत ३३१७५.३ मि.मी. पाऊस पडला असून त्यांची सरासरी १००५.३ मि.मी. इतकी आहे. आज १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण ३३ मंडळात ३२९६.५ मि.मी. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी ९९.९ मि.मी. इतकी आहे. जिल्ह्यातील गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, देवरी, आमगाव, सालेकसा, सडक अर्जुनी या तालुक्यात अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली. तिरोडा तालुक्यात केवळ ५३.८ मि.मी. इतका सरासरी पाऊस पडला.सालेकसा तालुक्यात काही नाल्यांनाही पूर आले असून तिरखेडी ते लोहारा, बोदलबोडी ते भजेपार, लोहारा ते शेडेपार हे ग्रामीण मार्ग प्रभावित झाले होते. त्यामुळे आज सकाळपासूनच हे मार्ग बंद झाले होते. तर कोटरा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असल्याने हाजराफॉल येथील पाण्याची पातळी वाढली असून तेथील पाणी सालेकसा ते दर्रेकसा राज्यमार्गावर येवून हा बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्याच बरोबर अर्जुनी – मोर तालुक्यातील अर्जुनी ते इटखेडा हा ग्रामीण मार्ग प्रभावीत झाला असून नवेगावबांध ते गोंदिया हा राज्यमार्ग बंद झाला आहे. कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यात कुठेही मोठी हानी झाली नसली तरी संपूर्ण जिल्ह्यात वीज वाèयासह मुसळधार पाऊस बरसला आहे
१७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पर्यंत तालुकानिहाय पडलेला पाऊस पुढील प्रमाणे असून त्याची सरासरी कंसात दर्शविण्यात आली आहे. गोंदिया तालुका- ५५९.५ मि.मी.(७९.९ मि.मी), गोरेगांव तालुका- ३५९.७ मि.मी.(११९.९ मि.मी), तिरोडा तालुका- २६९ मि.मी.(५३.८ मि.मी), अर्जुनी मोरगाव तालुका- ४७४.४ मि.मी. (९४.९ मि.मी), देवरी तालुका- ४४५ मि.मी.(१४८.३ मि.मी), आमगांव तालुका- ४४५.६ मि.मी. (११३.९ मि.मी.), सालेकसा तालुका- ३२०.१ मि.मी.(१०६.७ मि.मी.) आणि सडक अर्जुनी तालुका- ४१३.२ मि.मी.(१३७.७ मि.मी) असा एकूण ३२९६.५ मि.मी. पाऊस पडला असून त्याची सरासरी ९९.९ मि.मी. इतकी आहे. सर्वाधिक पाऊस देवरी तालुक्यातील देवरी मंडळात १६५ मि.मी. पाऊस झाला आहे.
०००००