विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी एकत्र या-नाना पटोले

0
18

भंडारा दि.१७-: भारताचे दिवंगत राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न साकार करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. त्यांच्या स्वप्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची सांगड घालून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तरच भंडारा जिल्ह्यावरील मागासलेपणाचा कलंक पुसता येईल, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
महर्षीविद्या मंदिर येथे आयोजित इन्स्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या उद््घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर जि.प. उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नीलकंठ टेकाम, शुभांगी रहांगडाले, उपमुख्य कार्यकारी सुधीर वाळके, जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर, नीलकंठ कायते, सुभाष वाघमारे, धिनेंद्र पुरोहित, शिक्षणाधिकारी किसन शेंडे, प्राचार्य o्रृती ओहळे, मुख्य परीक्षक अविनाश सेनाड, उपशिक्षणाधिकारी हेंमत भोंगाडे, संजय आयलवार, लक्ष्मणराव बालवाड आदी उपस्थित होते.
खा. पटोले यांच्या हस्ते शाळेच्या हॉलमध्ये स्थापित करण्यात आलेल्या भारतरत्नडॉ. अब्दुल कलाम हॉलचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी अतिथींनी गुरुपुजेने कार्यक्रमाची सुरुवात केली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले.
शिक्षणाधिकारी शेंडे म्हणाले विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी शासनाचा योजनाचा जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे. आजचे बाल वैज्ञानिक भविष्याचे आदर्श नागरिक आहेत. राजेश डोंगरे म्हणाले विद्यार्थ्यांसह सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून व्यवहार करणे काळाची गरज झाली आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा व प्रेरणेची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांनी जिल्ह्यातील ३२५ शाळेतीलविद्यार्थ्यांनी साकारलेल्या प्रतिकृतींचे अवलोकन केले. तसेच विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांचे मुक्तहस्ताने कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसन शेंडे यांनी तर संचालन मुकुंद ठवकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्यo्रृती ओहळे यांनी केले. प्रदर्शनीसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले